शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (18:08 IST)

WhatsApp Call Record: व्हॉट्सअॅप कॉल्स कसे रेकॉर्ड करायचे? सोप्या युक्त्या अवलंबवा

whatsapp
How To Record WhatsApp Calls:  व्हॉट्सअॅपहे एक लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे जे अनेक लोकांनी त्यांच्या फोनमध्ये डाउनलोड केले आहे आणि ते दररोज वापरत आहेत. या अॅपमध्ये एंड टू एंड एनक्रिप्शन ते पेमेंट (WhatsApp पेमेंट) पर्यंतची वैशिष्ट्ये आहेत. पण व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करण्याची सुविधा नाही.
 
व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करण्यासाठी अॅपवर कोणतेही विशेष फीचर नसले तरी या कामासाठी थर्ड पार्टी अॅपची म्हणजेच इतर कोणत्याही अॅपची मदत घेतली जाऊ शकते.अँड्रॉइड फोन मध्ये व्हॉट्सअॅप कॉल कसे रेकॉर्ड करावे जाणून घेऊ या .
 
1 Google Play Store वरून थर्ड पार्टी अॅप Cube ACR डाउनलोड करा आणि फोन किंवा डिव्हाइसवर इंस्टाल करा.
 2 क्यूब कॉल ऍप्लिकेशन उघडा, मिनिमाइज करा आणि नंतर व्हॉट्सअॅप वर स्विच करा
3 जेव्हाही तुम्ही व्हॉट्सअॅप वर कॉल कराल किंवा कॉल प्राप्त कराल तेव्हा तुम्हाला क्यूब कॉलचे बटण दिसेल. बटण दिसत नसल्यास, व्हॉट्सअॅपकॉलवर असताना क्यूब कॉल उघडा आणि व्हॉइस कॉलसाठी "Force VoIP" निवडा.
4 आता तुमचा व्हॉइस कॉलव्हॉट्सअॅप वर आपोआप रेकॉर्डिंग सुरू होईल. ऑडिओ फाइल तुमच्या डिव्हाइसच्या मेमरीमध्ये सेव्ह केली जाईल.
 
आयफोनवर व्हॉट्सअॅप कॉल कसे रेकॉर्ड करावे ?
1 मॅकवर क्विकटाइम अॅप डाउनलोड करा. हे अॅप मोफत
2 तुमचा iPhone Mac शी कनेक्ट करा आणि QuickTime अॅप उघडा
3 अॅपच्या फाइल्स विभागात जा आणि "New Audio Recording" पर्यायावर क्लिक करा
4 पर्याय म्हणून आयफोन निवडा आणि रेकॉर्ड बटण दाबा
5 iPhone वरून व्हॉट्सअॅप कॉल करा. कॉल रेकॉर्डिंग मॅकमध्ये सेव्ह केले जाईल.