सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मार्च 2022 (17:20 IST)

गोरखपूरमधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 1 लाखाहून अधिक मतांनी विजयी

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत गोरखपूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून योगी यांना प्रचंड मतांनी विजयी घोषित करण्यात आले आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे. बसपाने गोरखपूर शहर विधानसभेसाठी ख्वाजा शमसुद्दीन यांना तिकीट दिले होते, तर भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद हे योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात रिंगणात होते.
 
गोरखपूरमधून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद, समाजवादी पक्षाच्या शुभवती शुक्ला आणि बसपचे शमसुद्दीन ख्वाजा रिंगणात होते. योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या घरच्या मतदारसंघातून विधानसभेच्या जागेसाठीची ही पहिलीच पूर्ण लढत होती, जिथून त्यांनी अनेकदा लोकसभेची जागा लढवली आणि जिंकली.