1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2022 (16:25 IST)

Exit Poll 2022: यूपी, उत्तराखंडमध्ये कोणाची सरकार बनणार?

Exit Poll 2022: Who will form the government in UP
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 2022 चा सातवा टप्पा संपल्यानंतर संध्याकाळी एक्झिट पोल येणे सुरू होईल. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरसह पाच राज्यांमध्ये मतदान झाल्यानंतर 10 मार्चला निकाल लागण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात एक्झिट पोलचे निकाल आज संध्याकाळी 6 नंतर येण्यास सुरुवात होईल.
 
10 फेब्रुवारीपासून यूपीमध्ये सात टप्प्यात मतदान पार पडले आहे. मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारीपासून दोन टप्प्यात, तर उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान झाले. पंजाबमध्येही 20 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान झाले. सर्व विधानसभा निवडणुकांचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत.
 
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान कोणताही ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल जारी करता येत नाही. असे करणे हे नियमाचे उल्लंघन आहे आणि ते मोडल्यास माध्यम समूहांवरही कारवाई होऊ शकते.