शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (15:34 IST)

सरकारने तुम्हाला देवावर सोडले आहे: प्रियांका गांधी

Uttar Pradesh Assembly Election 2022 काँग्रेसच्या प्रतिज्ञा रॅलीत प्रियंका गांधी म्हणाल्या की काल मी जाहीर सभेत विचारले की किती तरुण आहेत तर सगळे तरुण हात वर करतात पण मग मी विचारले तुमच्यापैकी किती जणांना गेल्या 5 वर्षात रोजगार मिळाला तर सगळे हात खाली आले.
 
प्रियंका म्हणाल्या की जेव्हा मी शेतात काम करणाऱ्या महिलांशी बोलले, तेव्हा मला 8-10 तरुणी दिसल्या. तेव्हा मी त्यांना विचारले, तुम्ही अभ्यास करता का? हसायला लागल्या म्हणाल्या दीदी, आम्ही वाटाणा काढतो. फक्त काही जण म्हणाल्या की त्या शाळेत जातात, पण शेतातही काम करावे लागतं. नंतर दुकानदारांची भेट घेतली. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे त्यांच्यासारखे सर्वच छोटे दुकानदार प्रचंड नाराज असल्याचे समजले.
 
प्रियांका गांधी म्हणाल्या की भाजप सरकार आपल्या उद्योगपती मित्रांसाठी सर्व काही करत असल्याचे वास्तव आहे. देशाच्या संपत्ती मित्रांच्या हाती जात आहेत.