मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (15:46 IST)

जगातील सर्वात जास्त वेळ 'किस'ची कहाणी; 58 तास, 35 मिनिटे आणि 58 सेकंद एकमेकांचे चुंबन घेत विक्रम केला

Thai couple smooch to a new Guinness World Record
जगात अनेक विचित्र गोष्टींच्या नोंदी झाल्या आहेत. ज्यांच्या रेकॉर्डचाही यात समावेश आहे. जगातील सर्वात लांब चुंबन घेण्याचा विक्रम थायलंडमध्ये झाला. व्हॅलेंटाईन वीकच्या किस डे दरम्यान हा विक्रम केला गेला. या चुंबनाचा विक्रम थायलंडमधील एका जोडप्याने केला आहे.
 
2013 मध्ये, 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान जगातील सर्वात लांब चुंबन नोंदवले गेले. या जोडप्याने 58 तास, 35 मिनिटे आणि 58 सेकंद एकमेकांचे चुंबन घेत विक्रम केला होता. थायलंडच्या म्युझियम रिपल्स बिलीव्ह इट अँड नॉट की या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. व्हॅलेंटाईन वीकनिमित्त आयोजित या स्पर्धेत 9 जोडप्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत एका 70 वर्षीय जोडप्यानेही सहभाग घेतला होता.
 
थायलंडमधील पटाया येथे झालेल्या या स्पर्धेत एक्काचाय तिरनारत आणि लक्ष्या तिरनारत या दाम्पत्याने विक्रम केला. स्पर्धा जिंकल्यानंतर या जोडप्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचवेळी दोघांनाही रोख पारितोषिक आणि हिऱ्याची अंगठी आयोजकाकडून देण्यात आली.
 
आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे ही स्पर्धा जिंकणार्‍या जोडप्याने याआधीच किस करण्याचा विक्रम केला आहे. याआधीही या जोडप्याने 2011 मध्ये किस करण्याचा विक्रम केला आहे. जे 46 तास, 24 मिनिटे आणि 9 सेकंद चालले. त्यादरम्यान या जोडप्याची जगभरात चर्चा झाली.
 
2011 आणि 2013 मध्ये दोन रेकॉर्ड बनवल्यानंतर, हे जोडपे थायलंडमध्ये खूप प्रसिद्ध झाले आणि सेलिब्रिटींप्रमाणे त्यांचे फोटो-व्हिडिओ व्हायरल झाले. त्याचा विक्रम आतापर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही.