शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 (14:56 IST)

युतीबाबत दुपारी फैसला, नितीन गडकरी मुंबईकडे रवाना!

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्रातील राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. शिवसेना आणि भाजपची 25 वर्षे युती तुटण्याचीही शक्यता वर्तवली जात असताना केंद्रीयमंत्री आणि भाजपचे ज्येष्‍ठ नेते नितीन गडकरी मुंबईकडे रवाना झाले आहे. यापूर्वी गडकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. 

शिवसेना आणि भाजपची युती कायम राहावी, यासाठी पंतप्रधान मोदी यांनीही प्रयत्न सुरु केले आहेत. कदाचित हाच निरोप घेऊन गडकरी पारी दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाले असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
 
शिवसेना भाजपला 120 पेक्षा जास्त एकही जागा देणार नसेल तरीही चालेल पण युती तुटू नये, अशी आपली इच्छा असल्याचे मोदींनी गडकरींना सांगितले आहे. 
 
दुसरीकडे, प्रदेश भाजपच्या कोअर सम‍ितीची मुंबईत बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला निवडणूक प्रभारी ओ.पी. माथूर, राजीव प्रताप रूडी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगुंटीवर, एकनाथ खडसे आदी सर्व नेते उपस्थित आहेत.  
 
भाजप-शिवसेना युती संपुष्टात आल्याची चर्चा सकाळपासून सुरु असूनही शिवसेने आतापर्यंत कुठलीही ‍भूमिका स्पष्ट केलेली नाही.