राष्ट्रवादीला 128 जागांचा प्रस्ताव, 14 मतदार संघांची नावे दिली
विधानसभा निवडणुकींची अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ आली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबाबत तोडगा निघाला नाही. आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. कॉंग्रेसने राष्ट्रवादीला 128 जागांचा प्रस्ताव दिला आहे. गत निवडणुकच्या फॉम्युल्यानुसार तब्बल 14 जागा वाढवून दिल्या आहेत.
2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने राष्ट्रवादीला 114 जागा दिल्या होत्या. आता त्यात 14 जागा अधिकच्या देऊ केल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसने 14 मतदारसंघाची नावे राष्ट्रवादीला कळवली आहेत. तरी देखील राष्ट्रवादीला हा प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता कमी आहे. यातील 12 जागा अपक्ष व राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार असल्यामुळे हा प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता तशी कमीच आहे.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अंतिम व आघाडी तोडण्याचा अथवा करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता अधिक आहे.