शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: जळगाव , बुधवार, 17 सप्टेंबर 2014 (14:06 IST)

‘नोटा’ही घ्या आणि ‘नोटा’चे बटण दाबा- 'आप'चा फंडा

विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. यंदाच्या निवडणुकीत 'नोटा' (वरील पैकी एकही नाही) वापर केला जाणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. त्यात  आम आदी पक्षाने मतदारांनी 'नोटा घ्या पण नोटाचे बटन दाबा', असा संदेश देत जनजागृतीचा नवा फंडा सुरू केला आहे.

विधानसभा लढणार्‍या काही उमेदरवांची प्रतिमा भ्रष्ट आहे. त्यामुळे आपने जनजागृतीचा फंडा सुरु केल्याची माहिती आपचे नेते डॉ. संग्राम पाटील यांनी दिली आहे. डॉ. पाटील यांनी आपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होते. विधानसभा निवडणुकीत संग्राम पाटील मतदारांमध्ये जनजागृतीसाठी प्रयत्न करीत आहेत.

महाराष्ट्रासह हरियाणा विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करण्याची भूमिका 'आप'ने घेतली आहे. विनाधसभा निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांकडून पैसे घ्यावे परंतु बॅलेट मशिनवरील 'नोटा'चे बटन दाबून भ्रष्ट उमेदवारांबद्दलची नाराजी व्यक्त करावी, अशी जनजागृती 'आप'तर्फे केली जात आहे.