रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. सावरकर
Written By वेबदुनिया|

काळेपाणी

ND
ब्रिटीश सरकारविरूद्ध बंड करण्याच्या आरोपावरून ब्रिटीश न्यायाधिशांनी सन 1910 मध्ये सावरकरांना दोन जन्मठेपेची म्हणजे 50 वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा दिली. आणि ती शिक्षा भोगण्यासाठी सावरकरांना मद्रासपासून 700 मैल दूर समुद्रात असलेल्या अंदमान बेटावर पाठविले. तेथे त्यांना एका कोठडीत हातापायात बेड्या ठोकून कोंडले होते. कसलातरी पाला आणि किडलेले धान्य तेथे खावे लागे. सावरकर याविरुद्ध चळवळ करीत. दिवसा हे कष्टाचे काम करणारे सावरकर मनातल्या मनात कविता रचीत.

त्या काट्याने भिंतीवर लिहीत, पाठ करीत. कारण तेथे त्यांना लिहायला कागद दिला जात नसे. अंदमानात असतांना सावरकरांनी कमला, विरहोच्छ्वास, महासागर, गोमांतक असे एका महाकाव्याचे चार सर्ग लिहिले आहेत. अंदमानात सावरकर तेथे शिक्षा भोगणार्‍या चोर, दरोडेखोरांना लिहावयास, वाचावयास शिकवीत. हिंदू कैद्यांना ते सांगत की अस्पृश्यता, जातिभेद पाळणे हा खरा धर्म नव्हे. मुसलमानांना ते सांगत तुम्ही पूर्वी हिंदू होता परत हिंदू व्हा.

अंदमानात मिळणारे वा‍ईट अन्न आणि कष्टप्रद जीवन यामुळे सावरकर तेथे बरेच आजारी झाले. अमेरिका, जर्मनी आदी परदेशात गेलेल्या क्रांतिकारकांनी पहिल्या महायुद्धाच्या वेळी सावरकर आणि लाला हरदयाळ यांच्या प्रेरणेने गदर नावाची सशस्त्र क्रांतीची स्वातंत्र्याप्राप्तीची चळवळ जोरात चालू केली. या चळवळीच अनेकांना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यामुळे पुढे सन 1929 मध्ये ब्रिटीश सरकारने भारतीयांना काही अधिकारपदे देऊन सावरकरांना अंदमानातून इकडे आणले आणि तीन वर्षे रत्नागिरी, पुणे येथील करागृहात ठेवले. 14 वर्षांनी म्हणजे 1924 मध्ये सरकारने सावरकरांना कारागृहातून सोडून रत्नागिरी येथे स्थानबद्ध केले.

सुधारक सावरक
रत्नागिरी येथे सन 1924 ते 1937 अशी 13 वर्षे सावरकर स्थानबद्ध होते. त्या काळात त्यांनी माझी जन्मठेप, भाषाशुद्धी, लिपीसुधारणा, हिंदुत्व, हिंदुपदपादशाही ही विचारप्रवर्तक पुस्तके लिहिली. तसेच उ:शाप, संन्यस्त खङग, उत्तरक्रिया ही तीन नाटके, मोपल्यांचे बंड अथवा मला काय त्याचे आणि काळेपाणी या दोन कादंबर्‍या लिहिल्या. त्या वाचून विज्ञाननिष्ठ आणि समाज सुधारणा करणारे अनेक लेख नि गोष्टीही लिहिल्या.

याच काळात त्यांनी भाषाशुद्धी- लिपीसुधारणा करण्यासाठी आणि अस्पृश्यता, जन्मजात जातीभेद, रोटीबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी आदि सात स्वदेशी श्रृंखला तोडण्यासाठी भाषणे दिली. सहभोजनांची प्रथा चालू केली. सर्व हिंदूंना जातीभेद न पाळता प्रवेश देणारे पतितपावन मंदिर बांधले. परधर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदु करून घेतले. या काळात सावरकरांना राजकारणात भाग घेण्यास बंदी होती. तरीही त्यांनी अन्य नावाने काही नियतलिकातून राजकीय लेख लिहिले. सरदार भगतसिंह, वा.ब. गोगटे, वा. ब. चव्हाण, वैशंपायन प्रभृती सशस्त्र क्रांतीकारकांना गुप्तपणे प्रोत्साहन दिले. पुढे मुंबई प्रांतात कूपर जमनादास मेहता मंत्रीमंडळ आले. ह्या मंत्र्यांनी सावरकरांना बंधमुक्त करण्याचा आग्रह धरल्याने इंग्रजी राज्यकर्त्यांनी 10 मे 1937 ला सावरकरांना बंधमुक्त केले.