1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Updated: शनिवार, 9 जुलै 2022 (13:40 IST)

विठू तुझी हाक माझ्या कानावर आली

vitthal rukmani
विठू तुझी हाक माझ्या कानावर आली,
कधी जातो असं झालं,  तहान भूक हरपली.
 निघालो भान हरपून वाट  धरली वारीची ,
डोळ्यांना लागली आस तुझ्या दर्शनाची,
माय बाप तू लेकराचा, पदरी मज घ्यावं ,
होईल जीवन सार्थक,त्याच सोनं पायी तुझ्या व्हावं!
संकट मजवर येता,लीलया ते झेलशील!
माऊली तू माझी वेगेवेगे धावत येशील,
कर कृपा देवा, आता मजपाशी नसे धीर,
खूप खूप सोसले मी, जगणं व्हावं आता स्थिर.
..अश्विनी थत्ते