1. लाईफस्टाईल
  2. शुभेच्छा व अभिवादन
  3. शुभेच्छा संदेश
  4. Birthday Wishes for Friend in Marathi for Girl

Birthday Wishes for Friend in Marathi for Girl मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील सर्वात गोड,
सुंदर आणि जिवाभावाच्या मैत्रिणीला 
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! 
देव करो आणि तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने 
लवकरच पूर्ण होवोत
हॅपी बर्थडे डिअर!
 
सुख-दुःखात नेहमी सोबत असणारी, 
कधी ताई तर कधी आई सारखी काळजी घेणारी 
माझी बेस्ट फ्रेंड! तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 
तू नेहमी अशीच हसत राहा!
 
तुझ्या चेहऱ्यावरील हे सुंदर हास्य कधीच कमी न होवो, 
तुझ्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव राहो
जगातल्या सर्वात भारी मैत्रिणीला 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
न सांगता मनातील ओळखणारी 
प्रत्येक संकटात खंबीरपणे 
पाठीशी उभी राहणारी मैत्रिण लाभणे 
हे माझे भाग्य आहे
माझ्या लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
 
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, 
कारण आज माझ्या सर्वात लाडक्या 
आणि वेड्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे! 
पार्टी कधी देतेयस एवढं सांग? हॅपी बर्थडे ग!
 
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला तुझी साथ लाभो, 
तुझा प्रत्येक दिवस आनंदाने आणि यशाने भरलेला असो
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
 
नातं आपलं मैत्रीचं, 
दिवसागणिक अधिकाधिक बहरत जावं... 
आजच्या या खास दिवशी 
तुला आयुष्यातील सर्व सुख मिळावं
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माय बेस्ट फ्रेंड!
 
दिसतेस तू खूप क्युट, 
बोलतेस तू खूप स्वीट! 
देवाकडे एकच प्रार्थना आहे, 
तुला मिळो जगातील सगळा आनंद 
हॅपी बर्थडे!
 
आयुष्यात अनेक लोक येतात आणि जातात, 
पण तुझ्यासारखी खरी आणि 
प्रामाणिक मैत्रिण नशिबानेच मिळते
माझ्या आयुष्यातील या खास व्यक्तीला 
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
 
नेहमी हसणारी, सगळ्यांना हसवणारी 
आणि स्वतःच्या स्टाईलमध्ये जगणारी 
माझी बिनधास्त मैत्रिण! 
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
येणारे वर्ष तुला भरभराटीचे जावो!
 
परमेश्वराकडे एकच प्रार्थना आहे की, 
तुझ्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासू नये
तुझी आणि माझी मैत्री अशीच जन्मोजन्मी टिकून राहो
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
 
तुझ्या आयुष्याची सुरुवात नेहमी उत्साहाने व्हावी, 
आणि प्रत्येक यशाच्या शिखरावर तुझे नाव असावे
जगातील सर्वात सुंदर मनाच्या मैत्रिणीला 
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
पुढील लेख
Korean Maggi व्हायरल कोरियन स्टाइल मॅगी; फक्त २ मिनिटांत बनवा