बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. वर्ल्डकप इतिहास
Written By
Last Modified: गुरूवार, 5 फेब्रुवारी 2015 (17:16 IST)

दुसर्‍या विश्वकपाचा (1979) इतिहास

चार वर्षांनंतर 1979मध्ये एक वेळा परत विश्व कप क्रिकेटचे आयोजन करण्यात आले आणि यजमान देश होते इंग्लंड. या विश्वकपाचा स्वरूप 1975 विश्व कपाप्रमाणेच होता. आठ संघाने या विश्वचषकात भाग घेतला होता. चार-चार संघांचे दोन गट तयार करण्यात आले आणि दोन शीर्ष संघांना सरळ सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळाला. सामना 60 ओवरचा होता आणि खेळाडूंनी पांढर्‍या रंगाचे वस्त्र धारण करून मैदानात उतरले.
 
त्या वेळेस ग्रुप ए मध्ये इंग्लंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि कनाडाचे संघ होते, तर ग्रुप बी मध्ये वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, श्रीलंका आणि  भारत. श्रीलंका संघ आयसीसी ट्रॉफी जिंकल्यामुळे विश्व कपामध्ये खेळण्यात आली होती. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने एक अनोळख्या   संघाची निवड केली, कारण त्याचे उत्तम खेळाडू केरी पॅकरसोबत जुळलेले होते.  
 
किताबाचा तगडा दावेदार वेस्ट इंडीजचा संघ दोन अधिक सामने जिंकून आपल्या गटात शीर्ष स्थानावर राहिला. श्रीलंकाविरुद्ध त्याचा सामना पावसामुळे रद्द झाला. श्रीलंकाने भारताचा पराभव करून प्रतिस्पर्धेचा सर्वात मोठा बदल केला. या सामन्यात श्रीलंकाने भारताला 47 धावांहून पराभूत केले. या ग्रुपमध्ये न्यूझीलंडचा संघ दुसर्‍या क्रमांकावर राहिला. भारतीय संघ या विश्वचषकात एकही सामना जिंकू शकला नाही.   
 
ग्रुप ए हून इंग्लंडच्या संघाने सर्व सामने जिंकून शीर्ष स्थान प्राप्त केले, तर पाकिस्तानने कनाडा आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव करून सेमीफायनलमध्ये आपली जागा बनवली. ग्रुप स्टेजवर इंग्लंडने कनाडाला फक्त 45 धावांवर आऊट केले पण दोन्ही ग्रुपमध्ये शतक फक्त एकच लागला. वेस्ट इंडीजच्या गॉर्डन ग्रीनिजने भारताविरुद्ध 106 धावांची पारी खेळली.  
 
पहिल्या सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडचा सामना होता. माइक ब्रियरली आणि ग्राहम गूचच्या शानदार डावामुळे इंग्लंडने आठ विकेटवर 221 धावा काढल्या. डेरेक रेंडलने देखील 42 धावांचा महत्त्वाचा डाव खेळला. न्यूझीलंडने देखील चांगली सुरुवात केली आणि जॉन राइटने 69 धावा काढल्या. पण इंग्लंड संघ नऊ धावांनी पराभूत झाला. 
 
दुसर्‍या सेमी फायनलमध्ये प्रथम खेळताना वेस्ट इंडीजने सहा गडी बाद 293 धावा काढल्या. ग्रीनिजने 73 आणि डेसमंड हेंसने 65 धावा काढल्या. विवियन रिचर्ड्सने पण 42 धावांचा योगदान दिला. पण जाहीर अब्बास आणि माजिद खानने वेस्टइंडीचा घाम गाळला  घाम घाम केला. दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 166 धावांची भागीदारी केली. पण ते बाद झाल्याबरोबरच पाकिस्तानचा डाव डगमगवला आणि वेस्ट इंडीजला 43 धावांनी विजय मिळाला. माजिद खानने 81 आणि जाहीर अब्बासने 93 धावा काढल्या होत्या.   
 
23 जूनला लॉर्ड्सच्या मैदानावर लागोपाठ दुसर्‍यांदा फायनल खेळण्यासाठी पोहोचलेली वेस्टइंडीजची टीम तर या वेळेस इंग्लंडला देखील त्याचे नशीब बदलायचा एक मोका मिळाला. विवियन रिचर्ड्सने शानदार शतक ठोकले आणि कॉलिस किंगने उत्तम डाव खेळला. वेस्ट इंडीजने 286 धावा काढल्या. रिचर्ड्स 138 धावांवर नाबाद राहिले आणि किंगने 86 धावा काढल्या. इंग्लंडने चांगली सुरुवात केली आणि  पहिल्या विकेटसाठी 129 धावा काढल्या. पण धावा फारच हळू गतीने बनल्या होत्या. ब्रियरलीने 64 धावा काढल्या पण 130 चेंडूंवर जेव्हाकी बॉयकॉटने 105 चेंडूंवर 57 धावा. या दोघांचे आऊट झाल्याबरोबर इंग्लंडचा संघ धराशायी झाला. फक्त गूचने 32 धावा काढल्या. इंग्लंडचा संघ 51 ओवरमध्ये 194 धावा काढून आऊट झाली. वेस्ट इंडीजने लागोपाठ दुसर्‍यांदा विश्वकपावर आपला कब्जा ठेवला.