बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. वर्ल्डकप इतिहास
Written By
Last Updated : सोमवार, 2 फेब्रुवारी 2015 (13:36 IST)

बिचारा इंग्लंड - वर्ल्डकपचे तीन फायनल खेळला, पण जिंकला एक ही नाही

वर्ल्ड कपामध्ये इंग्लंड क्रिकेट संघाचे दुर्भाग्य म्हणायला पाहिजे. हा अनोखा विक्रम देखील इंग्लंड संघाच्या नावावर आहे की त्याने तीन वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळले पण एकदाही त्याला वर्ल्डकप ट्रॉफी हातात घेता आली नाही. हे ही फारच महत्त्वाचे की पहिला वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता.    
 
क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंडने आतापर्यंत चारवेळा वर्ल्ड कपाचे आयोजन केले आहे. इंग्लंड 1979मध्ये वर्ल्डकपच्या फायनलमध्ये वेस्ट इंडीजच्या हाती 92 धावांनी पराजित झाला होता. या वर्ल्ड कपात इंग्लंड यजमान देश होता. 1987मध्ये भारत-पाकिस्तानच्या संयुक्त आयोजनात झालेल्या वर्ल्ड कपात त्याला ऑस्ट्रेलियाने 7 धावांनी पराभूत केले होते.  
 
इंग्लंड लागोपाठ तिसर्‍यांदा 1992 मध्ये वर्ल्ड कपाच्या फायनलमध्ये पोहोचला. पाकिस्तानने इंग्लंडला 22 धावांनी पराभूत करून वर्ल्ड कपाची ट्रॉफीवर कब्जा केला. या प्रकारे वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वात जास्त पराभूत होण्याचा विक्रमपण इंग्लंड संघाच्या नावावर आहे.