ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान क्रिकेट संघाचा आतापर्यंत वादग्रस्त लढतीचाच इतिहास
ऑस्ट्रेलिया पाकिस्तान क्रिकेट संघात येथे शुक्रवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपान्त्यपूर्व फेरीचा सामना खेळला जात अाहे. ही लढत स्फोटक व संघर्षपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे.
या दोन संगातील यापूर्वीच्या झालेल्या लढती या संघर्षपूर्ण व वादग्रस्त ठरल्याचा इतिहास आहे आणि पाकिस्तानचे प्रमुख प्रशिक्षक बकार युनूस यांनी कबुली दिली. उपान्त्य फेरी गाठण्यासाठी यावेळी दोन्ही संघात होणारी लढत ही अटीतटीची अपेक्षित आहे, असे बकारने सांगितले.
मी ऑस्ट्रेलियाला कडवा प्रतिस्पर्धी मानत नाही, परंतु भीतीदायक शत्रूत्व मात्र आहे आणि हा सामना उच्च संवेदनक्षम ठरेल, असे या माजी वेगवान गोलंदाजाने सांगितले. आम्ही एकमेकांना मान देतो, परंतु मैदानावर मात्र एक इंचही देत नाही, अशी भर त्यांनी घातली.
1981 साली ही लढाई सुरू झाली. पर्थवरील कसोटी सामन्यात जावेद मियांदाने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डेनिस लिलीवर प्रतिहल्ले चढविले. त्यानंतर लिलीने मुद्दामच मियांदादला एकेरी धाव घेण्यास अडथळा आणला. त्यावेळी जावेदने लिलीला ढकलेले व बॅट मारण्याची धमकी दिली. लिलीने मियांदादला पंच व क्षेत्ररक्षकांसोमर ढकलले. लिलीला दंड झाला, परंतु दोन्ही संघातील शाब्दिक झुंजीस सुरुवात झाली.
1988 साली जावेदने ऑस्ट्रेलियाला सामान बॅगा करून मायदेशी जावे, असे सुचविले. त्यावेळी पंचांनी वादग्रस्त निर्णय दिले. त्यामुळे वाद निर्माण झाला होता.
1994 साली ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौर्यावर होता. त्यावेळी लेगस्पिनर शेन वॉर्न आणि टीम मे यांनी पाकिस्तानचा कर्णधार सलीम मलिक याने कराची कसोटीत खराब कामगिरीसाठी आम्हाला लच देऊ केल्याचा आरोप केला. मार्क वॉने आपणास एकदिवसीय स्पर्धेत खराब केळ करण्यास मलिकने सांगितले. असा आरोप केला होता. मलक आणि अनाऊर रेहमान यांच्यावर बंदी येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंची चौकशी करण्यात आली.
बकार युनूससह फिरकीचे प्रशिक्षक मुश्ताक अहमद, वासिम अक्रम यांना दंड करण्यात आला. 1999च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामन्यात पराभूत झाला व हा सामना एकतर्फी ठरला. त्यावेळी पाक खेळाडूंची मॅचफिक्सिंगची चौकशी जस्टीस करामत भंडारी आयोगाने केली, परंतु कोणी दोषी सापडले नाहीत. 2003च्या विश्वचषक सामन्यात या दोन राष्ट्रात जोहान्सबर्ग येते कडवा शेवट झाला. पाकिस्तानचा यष्टीरक्षक रशीद लतीफ याच्यावर वर्णद्वेचाचा आरोप ठेवण्याच आला होता. एकंदरीत या दोन संघातील सामने वादग्रस्त ठरले.