शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जून 2021 (19:08 IST)

मेंदू सक्रिय करण्यासाठी हे अवलंबवा

जगभरात सध्या ध्यान करण्याची प्रथा वाढली आहे.ध्यान केल्याने स्मरणशक्ती वाढते,मेंदू देखील शांत राहत.बऱ्याच प्रकारच्या मानसिक आजारांवर देखील उपचार केले जाते.ध्यानावर जगभरात अनेक प्रकारचे संशोधन झाले आहे. काही वर्षांपूर्वी केलेल्या संशोधनातून नवीन तथ्य समोर आले आहे.
 
मानसिक आणि शारीरिक महत्त्व आणि ध्यानाची उपयुक्तता प्रत्येक संशोधनात अधोरेखित केली गेली आहे, परंतु पेन्सल्व्हेनिया विद्यापीठाच्या माजी संशोधकांनी केलेल्या अलीकडील संशोधनात ध्यान आणि योगाद्वारे व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचा स्वीकार केला गेला आहे.
 
या संशोधनात संशोधकांनी शोधून काढले आहे की ध्यान द्वारे मेंदू तीन टप्प्यात एकाग्रचित्त केले जाऊ शकते.तसेच सक्रिय राहून मेंदूला प्रत्येक बिंदूत सक्रिय केले जाऊ शकते.या संशोधनाच्या दरम्यान सहभागींना एक महिन्यासाठी 30 मिनिटांसाठी ध्यानाच्या अवस्थेत ठेवले गेले.एका महिन्यानंतर, त्यांच्या मेंदूच्या कार्याचे मोजमापन केले गेले आणि त्यांच्या मानसिक क्रियांचे परीक्षण केले.
 
या संशोधनाचा परिणाम हा दिसला की या सहभागींच्या मेंदूत आणि वर्तनात बरेच सकारात्मक परिवर्तन झाले.या संशोधनाचे सविस्तर निष्कर्ष कॉग्निटिव्ह, इफेक्टस अँड बिहेवियरल न्यूरोसाइन्स' या पत्रिकेत प्रसिद्ध केले आहे.