रविवार, 25 सप्टेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (09:37 IST)

वजन कमी करण्यासाठी करत आहात हॉट योगा, तर हे जाणून घेणे आवश्यक आहे

वजन कमी करण्यासाठी हॉट योगा त्वरित मदत करतं. हे केल्यामुळे फार घाम गळतो आणि कॅलरी जलद जळते. हॉट योगा करणं थोडं अवघड आहे आणि या योगाला करणं प्रत्येकाला शक्य नसतं. पण हॉट योगा करताना काही सावधगिरी बाळगायची असते आणि असं करणं महत्वाचं आहे. 
 
हे योगासन करण्यासाठी खोलीचे तापमान 40 ते 45 डिग्री असावं. या नंतर 26 प्रकारची आसने आणि 2 प्राणायाम करावयाचे असतात. चला तर मग जाणून घ्या की हॉट योगा करताना कोणती खबरदारी घ्यावी.
 
* खाणे पिणे टाळा - 
हॉट योगा करण्याच्या पूर्वी पोट भरून जेवू नये. कारण पोट भरून जेवल्यामुळे योगा करताना आपल्या पोटात देखील वेदना होऊ शकतात. या व्यतिरिक्त जास्त पाणी पिणं देखील हानिकारक असू शकतं. जास्त पाणी प्यायलाने शरीर हायड्रेट होतं. ज्यामुळे हॉट योगा करण्यासाठी त्रास होऊ शकतो. 
 
* हॉट योगा करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या -
हॉट योगा करण्याच्या दरम्यान खोलीचे तापमान 40 ते 45 डिग्री असते. अश्या परिस्थितीत अति उष्णतेमुळे आपण आजारी देखील होऊ शकता. आपण एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्यास आपणास योग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर एखादी गरोदर स्त्री या योगाला करतं असल्यास त्यांनी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा. 
 
* अत्तर किंवा परफ्युम वापरू नये - 
हॉट योगामध्ये अत्यधिक घाम येतो. अश्या परिस्थितीत आपण अत्तर किंवा परफ्युम चे वापर करीत असल्यास हे आपल्या साठी हानिकारक ठरु शकतं. याचा मागील कारण असे की हॉट योगामुळे निघालेला घामाचा वास आणि पर्फ्युमचा वासामुळे आपल्याला चक्कर येऊ शकतात.
 
* हॉट योगा करण्यासाठी वेळ घ्या -
हा योगा करण्यासाठी आपल्याला आपल्या शरीराला बळकट करावे लागणार. हॉट योगा करताना या गोष्टी कडे जरूर लक्ष द्या की आपण या योगा हळू-हळू आणि आपल्या क्षमतेनुसार करावे. बऱ्याच वेळा द्रुत फायदे मिळविण्यासाठी काही लोकं एकाच वेळी हॉट योगा करून घेतात, असे करणं हानिकारक असू शकतं.