मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By

Yoga Asanas for Healthy Liver: चुकीच्या जीवनशैलीमुळे लिव्हर अशक्त होते, रोज 5 योगासन करा

trikonasana
Yoga For Liver Health- आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आपल्या शरीरातील प्रत्येक भाग चांगला असणे गरजेचे आहे. लिव्हर हा एक असा महत्वपूर्ण भाग आहे जो शरीरातील उपचारांचा मुख्य केंद्र असतो. लिव्हर चांगले असावे म्हणून योग्य आहार आणि योग्य व्यायाम करणे महत्वाचे असते. तुम्ही हे काही योगासन करून तुमचे लिव्हर आरोग्यदायी ठेऊ शकतात. चला तर जाणून घेऊया काही योगासनबद्दल. 
   
त्रिकोणासन (Trikonasana)- त्रिकोणासन हे शारीरिक आणि मानसिक स्थिरता वाढवणारे योगासन आहे. जे लिव्हरला आरोग्यदायी बनवते. हे आसान करतांना तुमचे शरीरातील प्रत्येक अंग ताणलेला असतो. ज्यामुळे लिव्हरच्या क्रियामध्ये सुधारणा होते. 
 
कपालभाति (Kapalbhati)- कपालभाति प्राणायाम लिव्हरच्या कार्यक्षमतेला वाढवायला मदत करते. याशिवाय हे श्वसन प्रणालीला देखील मजबूत बनवते आणि शरीरातील विषारी पदार्थांना देखील बाहेर काढण्यास मदत करते.  
 
ध्यान (Meditation)- ध्यान हे योगातील एक महत्वपूर्ण आसन आहे. जे मनाला शांती प्रदान करत. जास्त वेळ ध्यान लावून बसल्यास स्ट्रेस कमी होतो आणि लिव्हर चांगले ठेवायला मदत मिळते .
 
पवनमुक्तासन (Pawanmuktasana)- पवनमुक्तासन शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना आराम देते आणि पोटाच्या क्षेत्रातील माँसपेशींना संचालित करते हे आसन लिवरच्या कार्यक्षमतेला वाढवायला मदत करते आणि आरोग्यदायी ठेवते. 
 
धनुरासन (Dhanurasana)- धनुरासन केल्याने लिव्हरचे आरोग्य वाढते. या आसनाला करतांना मांसपेशी मजबूत होतात आणि संचालन चांगले होते. 
 
वरील योगासने तुमच्या लिव्हरचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. लक्षात ठेवा की हे व्यायाम योग्य पद्धतीनेच करावे. तसेच सोबत चांगला आहार, योग्य जीवनशैली देखील महत्वाची आहे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik