रविवार, 28 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Updated : शनिवार, 27 एप्रिल 2024 (09:14 IST)

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

yoga day
Yoga For Blood Pressure : वाढणारे ब्लड प्रेशर ही सामान्य समस्या बनते आहे. ज्यामुळे अनेक लोक चिंतित असतात. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी रोजच्या जेवणात बदल करणे जितके गरजेचे आहे तितकाच योगाभ्यास करणे देखील गरजेचे आहे. आज या लेख मध्ये आम्ही तुम्हाला काही अशा योगाभ्यास बद्द्ल सांगणार आहोत जे वाढलेल्या ब्लड प्रेशरला कंट्रोलमध्ये आणण्यास मदत करेल. 
 
शवासन-  हे आसान वाढलेले ब्लड प्रेशर नियंत्रित करते व शरीराला आराम देते. शवासन तुम्हाला स्ट्रेस फ्री ठेवण्यास मदत करते. तसेच शवासन तुमच्या शरीराला आणि मनाला शांत ठेवते. शवासन अभ्यास
दिवसभरात केव्हाही केला तरी चालतो. 
 
बलासन- वाढलेल्या ब्लड प्रेशरमध्ये बलासन करणे फायदेशीर असते. बालसन केल्याने शरीर निवांत राहते व ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. बलासनमुळे वाढलेले ब्लड प्रेशर लागलीच कमी होते. तसेच बालसन रोज केल्याने पाठीच्या कण्याला आराम मिळतो. 
 
अनुलोम विलोम- वाढलेल्या ब्लडप्रेशरला कमी करण्यसाठी अनुलोम विलोम हा एक चांगला योगाभ्यास आहे. हा योगाभ्यास केल्याने वाढलेले ब्लड प्रेशर लगेच कमी होते. जर तुम्ही रोज 5-10 मिनिट अनुलोम विलोमचा अभ्यास करत असाल तर यामुळे तुमचे ब्लड प्रेशर कायम नियंत्रणात राहील. 
 
शीतली- शीतली प्राणायाम वाढलेले ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यांचे ब्लड प्रेशर वाढत असेल त्यांनी है योगाभ्यास रोज करावा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik