yoga in night रात्री योगा करणे योग्य आहे का?
तुम्ही सकाळी लवकर उठू शकत नाही आणि दुपारी तुम्हाला योगा करण्यासाठी वेळ मिळत नाही, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या जीवनातून योगाला पूर्णपणे बाहेर काढून द्यायला पाहिजे. चांगली गोष्ट अशी आहे की योगाला तुम्ही आपल्या कार्यक्रमात कधीही फिट करू शकता. रात्री योगा करण्यात काहीच हरकत नसते. जर तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट कंपनीत काम करत असाल, तर तुम्ही रात्री योगा करू शकता, कारण तुमच्याजवळ हाच एक विकल्प असतो. पण रात्री योगा करण्याअगोदर काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहे ते जाणून घ्या...
जेवणानंतर तुम्हाला कमीत कमी 2-3 तास योगासनाचा अभ्यास नाही करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या कामानंतर थोडे फळं खाऊ शकता आणि जर तुम्ही रात्री 9 वाजता अभ्यास करणार असाल तर तुम्हाला 6.30 वाजता जेवण करायला पाहिजे.
रात्री असे काही योगासने करायला पाहिजे ज्याने तुम्हाला ऊर्जा आणि शांती मिळते. काही योगासने शांत आणि सशक्त असतात आणि संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस त्याचा अभ्यास चांगल्याप्रकारे होऊ शकतो.
तुम्हाला हे ही प्रयत्न करायला पाहिजे की तुमचा योग अभ्यास योग निद्रासोबत संपायला पाहिजे. योग निद्रा तुमच्या अभ्यास आणि तुमच्या दिवसात एक शांतिपूर्वक माध्यम बनायला पाहिजे.
जर तुमचे पीरियड्स सुरू असतील तर आधीच्या 2 दिवसांमध्ये रात्री योगा करू नये. त्याशिवाय जर तुम्ही गर्भवती असाल तर रात्री योगा करणे योग्य ठरत नाही.