रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (23:00 IST)

Lungs healthy ठेवण्यासाठी 3 योगासने

सध्या वातावरणात प्रदूषण वाढत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे हवा विषारी होत आहे.विषारी हवेच्या संपर्कात आल्याने फुफ्फुसांवर परिणाम होत आहे. या मुळे दम्याच्या धोका संभवतो.
श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त लोकांसाठी हे धोकादायक असू शकते. फुफ्फुसे हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. पण, आजच्या जीवनशैलीमुळे आणि प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे आपण दमा, टीबी इत्यादी श्वसनाच्या समस्यांना बळी पडू शकता. या साठी काही योगासने आहेत.फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी दररोज फक्त 10 मिनिटे3 श्वासोच्छवासाची योगासने करू शकता  चला तर मग जाणून घेऊ या. 

कपालभाती-
हा फुफ्फुसांसाठी चांगला योग आहे, यामुळे श्वसनसंस्था निरोगी राहते.कपालभाती केल्याने संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण चांगले होते.श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेमुळे, फुफ्फुस बराच काळ योग्यरित्या कार्य करतात.हे केल्याने फुफ्फुस निरोगी राहतात. 
 
कसे करावे- 
यासाठी वज्रासनात बसावे. 
दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. 
पाठीचा कणा सरळ ठेवून ध्यानाच्या मुद्रेत बसा.
दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. 
नंतर नाकातून श्वास सोडा. 
श्वास सोडताना पोट आत खेचा.
हे सतत करा. 
हे करत असताना तोंड बंद ठेवा. 
फक्त नाकातून श्वास घ्या आणि श्वास सोडा.  
हे 15 ते 20 वेळा करा.
 
अनुलोम-विलोम-
अनुलोम-विलोम रोज केल्याने फुफ्फुस मजबूत होतात आणि सर्दी, खोकला आणि दमा यांसारख्या समस्यांपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण होते. याशिवाय, अनुलोम-विलोम केल्याने तणाव देखील  दूर होतात. 
 
कसे कराल- 
हे करण्यासाठी, चटईवर बसा. 
नंतर उजव्या अंगठ्याने उजवे नाक धरा. 
डाव्या नाकातून श्वास घ्या. 
आता अनामिका बोटाने डाव्या नाकपुडी बंद करा. 
नंतर तुमची उजवी नाकपुडी उघडा आणि श्वास सोडा.
फक्त उजव्या नाकातून श्वास घ्या. 
या प्रक्रियेची पुनरावृत्ती करून डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा.
 
भास्रिका प्राणायाम-
या प्राणायामा मुळे कफ संबंधित समस्या दूर होतात . दररोज असे केल्याने श्वसन प्रणाली मजबूत होते आणि घशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
भस्त्रिका प्राणायाम केल्याने फुफ्फुसातील रक्त परिसंचरण वाढते, ज्यामुळे फुफ्फुस मजबूत होतात. याशिवाय, असे केल्याने वायू प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावांशी लढण्याची क्षमता वाढते.
 
कसे कराल- 
यासाठी पद्मासन आसनात बसावे.
मान आणि पाठीचा कणा सरळ ठेवा. 
आता दीर्घ श्वास घ्या आणि फुफ्फुसात हवा भरा. 
नंतर एकाच वेळी वेगाने श्वास सोडा. 
हे आसन एका वेळी किमान 10 वेळा करा.
 











Edited by - Priya Dixit    
 
l