गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: सोमवार, 22 मार्च 2021 (16:47 IST)

अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यासाठी हे योगासन करा

जिथे सर्व आसन जेवण्यापूर्वी केले जातात तिथे वज्रासन हे एकमेव असे आसन आहे जे जेवण्याच्या नंतर केले जाते. वज्रासनाचा सराव कोणीही करू शकतो. हे सर्वांसाठी फायदेशीर आहे. हे आसन पचनतंत्र बळकट करतो. तसेच पोटाच्या इतर समस्यांपासून देखील आराम देतो. इतर आसन करण्यासाठी केवळ 30 सेकंद ते 1 मिनिटचा वेळ दिला जातो. तर वज्रासन अर्धा ते एक तास पर्यंत देखील करू शकतो. चला वज्रासन करण्याची पद्धत आणि फायदे जाणून घ्या. 
 
वज्रासन करण्याची पद्धत- 
वज्रासन करणे खूप सोपे आहे. हे करण्यासाठी सर्वप्रथम गुडघ्यावर बसून घ्या. मागे सरकून कुल्हे टाचांवर ठेवून बसा.डोकं सरळ ठेवा आणि हात गुडघ्याजवळ ठेवा. शरीर ताठ ठेवा. डोळे मिटून घ्या आणि लक्ष श्वास घेण्यावर आणि सोडण्यावर केंद्रित करा.सुरुवातीला 5 ते 10 मिनिटे या आसनाचा सराव नियमितपणे करा नंतर हळू हळू वेळ वाढवून 20 ते 30 मिनिटे करा.
 
वज्रासनाचे फायदे - 
* गरोदर स्त्रियांची प्रसव वेदना कमी करण्यात मदत करतो आणि मासिक पाळीशी निगडित समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतो.
 
* वज्रासनाचा नियमित सराव पचन मध्ये सुधारणा करतो आणि बद्ध कोष्ठतेच्या त्रासाला नाहीसा करतो.
 
* पाठीचा कणा मजबूत करण्यासह खालील बाजूस होणाऱ्या वेदनेला कमी करतो. 
 
* दररोज वज्रासन केल्याने पोटाची अतिरिक्त चरबी सहजपणे कमी करता येते. म्हणून वजन कमी करण्यासाठी या आसनाचा नियमित सराव करावा.
 
* टीप- या लोकांनी वज्रासन करू नये- 
* ज्या लोकांची गुडघ्याची शस्त्र क्रिया झाली असेल.त्यांनी हे आसन करू नये.
* पाठीच्या कणाचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन करू नये. 
* आतड्यांचा अल्सर झालेल्या आणि हर्नियाच्या रुग्णांनी हे आसन करू नये.