बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: सोमवार, 20 जून 2022 (12:52 IST)

International Yoga Day 2022 Theme योगा डे 2022 थीम आणि वैशिष्ट्ये

Yoga for Humanity
दरवर्षी 21 जून रोजी देश आणि जगाच्या प्रत्येक भागात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय योग दिवस 2015 मध्ये 21 जून रोजी पहिल्यांदा साजरा करण्यात आला. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यासाठी योग महत्त्वाचा आहे. योगाचे हे महत्त्व पटवून देण्यासाठी, तसेच लोकांमध्ये त्याविषयी जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. या वर्षीही देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना योगाची जाणीव करून दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून यंदाच्या योग दिनाची थीम जाहीर केली आहे.
 
आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम International Yoga Day 2022 Theme
2022 मधील आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 8 व्या आवृत्तीची थीम 'मानवतेसाठी योग' म्हणजेच 'Yoga for Humanity' असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कर्नाटकातील म्हैसूरमध्ये आयोजित केला जाणार आहे. म्हैसूरमध्ये या विशेष कार्यक्रमाचे नेतृत्व पंतप्रधान मोदी स्वतः करणार आहेत. भारताच्या या उपक्रमामुळेच देशाला ‘योगगुरू’ म्हटले जाते. 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 2015 मध्ये 21 जून रोजी प्रथमच जगभरात योग दिवस साजरा करण्यात आला.