शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: सोमवार, 20 जून 2022 (12:46 IST)

पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा करण्यात आला?

sthirata shakti yoga benefits
आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 69 व्या सत्रात भाषण देताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर 11 डिसेंबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग दिन प्रस्ताव 3 महिन्यांत बहुमताने स्वीकारण्यात आला आणि 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. 2015 रोजी योग दिनाची सुरुवात झाली, त्यानंतर जगभरात दरवर्षी 21 जून रोजी योग दिवस साजरा केला जातो.
 
21 जून रोजी योग दिन साजरा करण्याचे कारण
दरवर्षी 21 जून रोजी योग दिन साजरा करण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत, त्यापैकी पहिले कारण म्हणजे या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर सर्वाधिक काळ राहतात. ज्याचा मानवी आरोग्य आणि जीवनाशी प्रतीकात्मक संबंध आहे. त्याच वेळी, दुसरे कारण असेही मानले जाते की 21 जून रोजी उन्हाळ्याच्या संक्रांतीच्या दिवशी सूर्य दक्षिणायन होतो आणि त्यानंतर येणार्‍या पौर्णिमेला भगवान शिवाने प्रथमच आपल्या सात शिष्यांना योगाची दीक्षा दिली. तथापि, हे कारण पौराणिक आणि धार्मिक विश्वासांवर आधारित आहे.