1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जून 2020 (22:31 IST)

काळी मुद्रा: याने म्हातारपण पळवा आणि पचन दुरुस्त करा

Kali Mudra for young look
योगामध्ये बऱ्याच प्रकाराचे शारीरिक मुद्रा आणि हस्त मुद्रांचा उल्लेख मिळतो. मुद्रांचे उल्लेख घेरंड संहिता आणि हठयोग प्रदीपिका मध्ये मिळतं. जाणून घेऊया काळी मुद्रा म्हणजे काय आणि कसे करावं?
 
काळी मुद्रा चे 3 प्रकार असतात
कसे करावे
1 पद्मासन, सिद्धासन किंवा वज्रासन मध्ये बसून आणि आपली जीभ सोयीनुसार बाहेर काढा. आपण कालिका मातेचा फोटो तर बघितला असेलच. त्यानुसार त्या मुद्रेत 30 सेकंद राहा.
 
2 दुसरी पद्धत म्हणजे आपल्या ओठांना शिटी वाजविण्यासारखा आकार द्या. तोंडाने दीर्घ श्वास घेऊन नाकावाटे सोडा. या वेळी आपली दृष्टी नाकाच्या टोकावर असायला हवी.
 
3 तिसरी पद्धत आहे हाताने मुद्रा बनवणे. या साठी आधी दोन्ही हातांचे बोट एकत्र करा. नंतर तर्जनी बाहेर काढून सरळ मिळवा. जसे कोणी हाताने पिस्तूल काढतो. ही मुद्रा करत हात आपल्या छातीच्या जवळ ठेवा. 10 वेळा ओम चे उच्चारण करून हात मोकळे सोडा.
फायदे
1 हे केल्याने आपल्या डोळ्यात साठलेले पाणी आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात किंवा पोटाच्या आत पोहोचतं ज्याने डोळे स्वच्छ आणि निरोगी होतात. त्याच बरोबर डोळ्या खालील झालेल्या सुरकुत्या नाहीश्या होतात. 
 
2 या मुळे शरीराच्या काही वैशिष्ट्य ग्रंथींमधून रसस्राव होतो आणि जुने आजार आणि म्हातारपण दूर करण्यास मदत होते. ही मुद्रा अन्नाला पचविण्याची प्रक्रियेस ही बरी करते.
 
3 या मुळे सकारात्मक भावना विकसित होते ज्यामुळे आत्मविश्वासा वाढ होते. याने आपल्या सरत्या वयाची गती मंदावते आणि पचन क्रिया सुरळीत होते.