शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (16:40 IST)

विपरीत दण्डासन Viparita Dandasana

एंग्जाइटी कमी करतं विपरीत दंडासन योग, योग्य विधी, फायदा आणि सावधानी जाणून घ्या
विपरीत दंडासन खरं तर संस्कृत भाषेचा शब्द आहे. हा शब्द तीन शब्दांनी मिळून तयार झाला आहे. पहिला शब्द ‘विपरीत’ याचा अर्थ उलटं असतं.
 
दूसरा शब्द ‘दंड’ याचा अर्थ डंडा असतो. तर तिसरा शब्द ‘आसन’ याचा अर्थ, विशेष परिस्थितीत बसणे, झोपणे किंवा उभे राहण्याची मुद्रा, स्थिती किंवा पोश्चर असा आहे. 
 
विपरीत दंडासन करण्याचे फायदे
शरीराच्या अनेक भागांना स्टिम्युलेट करतं.
शरीर मजबूत आणि स्ट्रेच करतं.
पचन सुधारतं.
मन शांत करतं आणि एंग्जाइटी लेवल कमी करतं.
साइटिका कमी करतं.
पाठीच्या खालच्या आणि मणक्याची लवचिकता सुधारतं.
छाती आणि फुफ्फुसांना नवीन रक्त वितरित करतं.
शरीरात संतुलन आणि समन्वय निर्माण करतं.
 
विपरीत दंडासन करण्याची योग्य पद्धत
योग मॅट वर शवासन मध्ये पडावे.
दोन्ही पायांच्या टाचा हळू-हळू वळवाव्या.
टाचा गुडघ्याच्या खाली घेऊन याव्या.
दोन्ही पाय हिप्सच्या तुलनेत अधिक रुंद असतील.
हात दुमडून तळवे कानाजवळ जमिनीवर ठेवा.
बोटांची टोके तुमच्या खांद्याकडे असतील.
काही सेकंद थांबा आणि श्वासाचा वेग संतुलित करा.
श्वास सोडताना गुडघे धडापासून दूर न्या.
जमिनीवर दाब ठेवून नितंब, खांदे आणि डोके हवेत उचला.
योग चटईवर हात घट्ट ठेवा.
खांद्याच्या ब्लेडचा विस्तार करून, टेलबोनच्या दिशेने दाब द्या.
हाताचा दाब खांद्यावर वळवण्याचा प्रयत्न करा.
हात वाकवून डोके हात आणि पाय यांच्यामध्ये ठेवा.
छाती उंचावलेली राहील.
श्वास सोडत एक हाथ डोक्यामागे घेऊन जा.
शरीराचं वजन हातावर टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा.
आता दुसरा हाथ डोक्यामागे घेऊन जा.
दोन्ही हाताचे बोटं आपसात अडकवून घ्या.
श्वास सोडत छाती हवेत उचला.
आता केवळ डोकं फरशीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा.
डोके वर करताना, योगा मॅटवर घोट्यांसह दाब द्या.
डोके मजल्याच्या जवळ राहील, या स्थितीत रहा.
आता काळजीपूर्वक आसन सोडण्याची प्रक्रिया सुरू करा.
पाय काळजीपूर्वक गुडघ्याच्या खाली आणा.
हात आणि कोपर यांच्या मदतीने शरीर काळजीपूर्वक उचला.
डोके वर करा आणि हळूहळू शरीर खाली आणा.
टेलबोन योग मॅटला शेवटपर्यंत स्पर्श करेल.
आपला श्वास मंद ठेवण्याचा प्रयत्न करा.
शवासनामध्ये सुमारे 2 मिनिटे विश्रांती घ्या.