मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: सोमवार, 15 जून 2020 (21:33 IST)

योग : हे 3 प्रकाराचे आसन नैराश्य दूर करतील

नैराश्यामुळे चिडचिड, राग येणे, आणि अनावश्यक ताण राहतो. यामुळे निराशेचे भाव, संकोचाचे भाव तयार होतात. असे झाल्याने माणसाच्या जीवनातून शांती, सुख आणि यश निघून जातं. काही लोकं याचा पासून सुटका मिळविण्यासाठी नशा करू लागतात. जेणे करून समस्या अजून गंभीर होते. काही जण झोपेचे औषध घेऊन आपल्या शरीराच्या प्रकृतीमध्ये बिघाड करतात. 
 
योगाचा नियमित सराव केल्यामुळे सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक त्रासापासून सुटका मिळू शकते. आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की अशे कोणते 3 आसन आहेत जे केल्याने आपण आपले उदासीनता, नैराश्य, किंवा तणावाला दूर करू शकता. 
 
महत्त्वाची सूचना : सर्वात आधी हे समजून घेण्याची गोष्ट म्हणजे आपल्या मनाचे भाव आपल्या श्वासाने नियंत्रित केले जातात. आपण लक्षात घ्या की ज्यावेळी आपल्याला राग येतो आपले श्वासोच्छ्वास वेगळ्या प्रकारे चालत असते. आणि आनंदी असताना श्वासोच्छवास वेगळा चालतो. म्हणूनच कुठल्याही प्रकारच्या ताणाला किंवा औदासिन्यला प्राणायामाने नियंत्रित केले जाऊ शकतं. प्राणायामामध्ये भ्रामरी, भ्रस्त्रिका आणि कपालभाती शिकावं. 
जाणून घेऊया आता हे 3 आसन.
 
1 विश्रामासान : हे आसन केल्याने माणसाला संपूर्णपणे विश्रामाची स्थिती जाणवते. म्हणून ह्याला विश्रामासन म्हणतात. ह्याचे दुसरे नाव बालासन आहे. हे 3 प्रकारे केले जाते. पोटावर झोपून, पाठीवर झोपून आणि वज्रासनामध्ये बसून. येथे सादर आहे पोटावर झोपून केले जाणारे हे विश्रामासान. हे काही मकरासनासारखे आहे.
 
कृती : पोटावर झोपून डावा हात डोक्याचा खाली जमिनीवर ठेवा. मानेला उजवीकडे वळवून डोक्याला हातावर ठेवा, डावा हात डोक्याखाली असावा आणि डाव्या हाताचे तळहात उजव्या हाताचा खाली असणार. उजवा पायाच्या गुडघ्याला दुमडून लहान मुलं झोपतात तसे झोपा. अश्याच प्रकारे दुसरी कडून देखील करावं.
 
खबरदारी : डोळे मिटावे. हातांना डोक्याखाली आपल्या सोयीप्रमाणे ठेवा. आणि शरीराला सैलसर सोडा. श्वास घेताना शरीराची हालचाल करू नये. श्वासोच्छ्वास दीर्घ आणि सावकाश घ्यावा.
 
फायदे : श्वास घेताना आपले मन शरीराने जुळलेले असतं. ज्यामुळे बाहेरचे काही विचार शरीरामध्ये तयार होत नाही. जेणे करून आपले मन पूर्णपणे आरामाच्या स्थितीमध्ये असतं, त्या वेळेस शरीरास शांतता जाणवते. अंतर्गत अवयव तणाव मुक्त होतात, ज्यामुळे रक्त विसरणं सुरळितपणे सुरू होतं आणि जेव्हा रक्त विसरणं व्यवस्थितरीत्या सुरळीत होतं, शारीरिक आणि मानसिक ताण कमी होतं. विशेषतः अश्या लोकांना ज्यांना उच्च रक्तदाब आणि निद्रानाशाचा त्रास आहे. अश्या रुग्णांना बालासनाने फायदे होतात. हे पचनतंत्र सुरळीत करतं. अन्नाचे व्यवस्थितरीत्या पचन करतं. शरीरामधील सर्व वेदनांना दूर करतं.
 
2 सेतुबंधासन : सेतूचे अर्थ आहे पूल. सेतुबंधनाच्यापूर्वी अर्धंसेतुबंधनासन करावं. यामध्ये व्यक्तीचा आकार एखाद्या पुलाच्या सम होतात. म्हणूनच याचा नावामध्ये पूल हे जोडलेले आहे.
 
खबरदारी : अर्धंसेतुबंधासन काळजीपूर्वक केले पाहिजे कोणत्याही प्रकाराचा हिसका देऊ नये. स्वतःचा तोल सांभाळा. जर आपल्या कंबर, तळहात आणि मनगटावर जास्त वजन पडत असल्यास सर्वात आधी भुजंगासन, शलभासन आणि पुर्वोत्तनासनचा सराव 1, 2 महिन्या पर्यंत करावं. त्यामुळे अर्धंसेतुबंधासनाचा अभ्यास आपल्यासाठी सोपा होईल. ज्यांना आधीपासूनच कंबरदुखी, स्लिपडिस्क किंवा अल्सरचा त्रास आहे त्यांनी अर्धंसेतुबंधासनाचा सराव करू नये.
 
आसनाचे फायदे : अर्धंसेतुबंधासनाने मन एकाग्र होते, जे चक्रासन करू शकत नाही, ते या आसनाचा लाभ घेऊ शकतात. स्लिप डिस्क, कंबर, ग्रीवा वेदना आणि पोटाच्या आजारावर फायदेशीर आहे. हे आसन मेरुदंडाच्या सर्व कशेरुकांना त्यांचा जागेवर ठेवतात. हे आसन कंबर दुखी दूर करण्यासाठी साहाय्य करतं. पोटाचे सर्व अवयव जसे की यकृत, स्वादुपिंड (पेनक्रीयाज) आणि आतड्यांमध्ये ताण येतं. बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो. भूक व्यवस्थित लागते.
 
3 शवासन : शव म्हणजे मृतदेह, म्हणजे आपल्या शरीराला मृतदेहाचे सम बनविण्यामुळे याला शवासन म्हटले जाते. श्वास घेताना आपले मन आपल्या शरीराशी जोडले जाते. ज्यामुळे शरीरामध्ये कोणतेही बाहेरचे विचार येतं नाही. त्यामुळे आपले मन आरामशीर स्थितीमध्ये असल्यामुळे शरीर शांती अनुभवतो. अंतर्गत अवयव तणावातून मुक्त होतात, जेणे करून रक्त पुरवठा सुरळीत होतो. आणि ज्यावेळी रक्त पुरवठा व्यवस्थित होतो त्यावेळी शारीरिक आणि मानसिक ताण कमी होतो. विशेषतः ज्यांना उच्चरक्तदाब आणि निद्रानाशाचा त्रास आहे, अश्या रुग्णांना शवासन करणं जास्त फायदेशीर आहे.  
 
कृती : पाठीवर झोपून दोन्ही पायांमध्ये जास्त अंतर ठेवा. तळपाय बाहेर आणि टाचा आतील बाजूस असतात. दोन्ही हात शरीरापासून सहा इंच लांब ठेवा. हाताची बोट दुमडलेली, मान ताठ असते. डोळे मिटलेले असतात.  
 
शवासनात सर्वात आधी पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंतचा भाग सैल सोडतात. पूर्ण अंग सैलसर सोडल्यावर सर्वात आधी आपल्या मनाला श्वास घेण्याचा क्रियेवर केंद्रित करतं आणि मनातून जाणवतं की दोन्ही नाकपुड्यांतून श्वास व्यवस्थितरीत्या आत बाहेर येतं आहे. जेव्हा श्वास आत येतो तेव्हा नाकाच्या टोकाला थंडावा जाणवतो. आणि श्वास बाहेर सोडताना गरम जाणवतो. या गरम आणि थंडाचे अनुभव घ्यावे.  
 
अशा प्रकारे नाकावरून छाती आणि बेंबी वर लक्ष केंद्रित करा. मनामध्ये 100 ते 1 पर्यंत आकडे मोजा. चुकल्यावर परत 100 पासून सुरू करा. लक्षात ठेवा की आपले लक्ष फक्त शरीरावर केंद्रित असावं. मनाच्या विचारांवर नाही. या साठी दीर्घ श्वास अनुभवा.
 
टीप : डोळे मिटून घ्यावे. हाताला अंगापासून किमान 6 इंच लांब ठेवावे. पायांमध्ये एक ते दीड फुटाचे अंतर राखणे. अंगाला सैल सोडावं. श्वास घेताना अंग हालवू नये.  आपणास वाटल्यास सुखासन, भुजंगासन आणि आंजनेयासन देखील करू शकता. पण शेवटी शवासनच करायला हवं. ते ही प्राणायामानंतर.