गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated: मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (08:54 IST)

Yoga For Fatty Liver फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त लोकांसाठी तीन योगासने प्रभावी

शरीराचे चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी लिव्हर निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. लिव्हर हे शरीराचे पॉवरहाऊस मानले जाते, जे अन्नाचे चांगले पचन राखण्याबरोबरच शरीरासाठी अत्यंत आवश्यक मानले जाणारे असे अनेक हार्मोन्स तयार करतात. अलीकडच्या काळात आहार आणि जीवनशैलीतील अडथळ्यांमुळे लिव्हरशी संबंधित विविध प्रकारच्या आजारांचा धोका लक्षणीय वाढला आहे, फॅटी लिव्हरची समस्या त्यापैकीच एक आहे.
 
फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त लोकांसाठी आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक मानले जाते. आहारासोबत दैनंदिन जीवनात काही योगासनांचा समावेश करणेही खूप फायदेशीर ठरू शकते. चला तर मग कोणती आहे ती योगासने जाणून घेऊ या.
 
1 बालासन- योगाचा सराव बालासन योगाचा नियमित सराव तुमचे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. लिव्हरसह पोटातील सर्व अवयवांची मसाज करणे आणि त्यामधील रक्ताभिसरणाला चालना देणे हे बालासन योगासनाचे फायदे असू शकतात. बालासन योगामुळे पाठीचा वरचा भाग मजबूत होतो आणि पाठीचा कणा, मांड्या, कूल्हे आणि घोट्याला चांगले ताणले जाते. पाठीचा कणा आणि हॅमस्ट्रिंगसाठी या योगाचा सराव करणे तुमच्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. 
 
2 शलभासन योग- शलाभासन योगाचा नियमित सराव तुमच्या पोटातील सर्व अवयवांसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. लिव्हरतुन  हार्मोन्सचे उत्पादन आणि पचन वाढवण्यासाठी या योगाचा सराव खूप उपयुक्त मानला जातो. लिव्हर व्यतिरिक्त, शलभासन योग मणक्याचे, पाठीचे आणि कोरच्या स्नायूंना ताणण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हे छातीचे स्नायू उघडते, पोटाच्या अवयवांना उत्तेजित करते ज्यामुळे त्यांचे कार्य सुलभ होते.
 
3 धनुषासन योग-या योगाचा नियमित सराव करणे फायदेशीर ठरू शकते. या योगाच्या सरावाने लिव्हरचे काम सोपे होते, तसेच या आसनामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. या योगाच्या सरावाने फॅटी लिव्हरची लक्षणे कमी होण्यासही फायदा होऊ शकतो. लिव्हर सोबत, पाठ, मांड्या, हात आणि छातीचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी हे योग आसन देखील खूप उपयुक्त मानले जाते.