शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: रविवार, 27 मार्च 2022 (15:55 IST)

Tourism :पूर्वजांच्या आत्म्याचे घर येथे बांधले जातात

प्रत्येकाच्या आयुष्यात  स्वतःचे घर बनवणे हे स्वप्न असते. पण आपण कधी पूर्वजांच्या आत्म्यासाठी घर बनवण्याचे ऐकले आहे का ? हे छत्तीसगडच्या अबुझमाड या गावात घडते. या ठिकाणी आपल्याला आत्म्याचं घर बनवलेले दिसते. इथे हंड्यात पूर्वजांच्या आत्म्याला ठेवले जाते. बस्तर जिल्ह्यात अशी अनेक ठिकाण आहे. इथल्या आदिवासी रहिवाशांच्या या गोष्टीत खूप विश्वास आहे. इथे एक ठिकाण आहे आना कुडमा. येथे आत्म्याचं घर बनवले जाते.  गोंडी भाषेत आना चा अर्थ आहे आत्मा आणि कुडमाचा अर्थ आहे घर. म्हणजे आत्म्याचं घर. 
 
बस्तरच्या आदिवासीबहुल भागात या रीती-भाती अतिशय कटाक्षाने पाळले जातात. अशा ठिकाणी महिला व मुलींच्या प्रवेशास सक्त मनाई आहे. लग्न समारंभाच्या आधी येथे जाणे अत्यंत आवश्यक आहे. लग्नाच्या पूर्वी हळद किंवा तेलाचा समारंभ असो की लग्नपत्रिकेचे वाटप, या ठिकाणी निमंत्रण दिल्या शिवाय येथे कोणतेही शुभ काम सुरू होत नाही. या ठिकाणी आदिवासी समाज आपल्या पितरांची स्थापना करून पूजा करतात. आना कुडमा म्हणजेच आत्म्याचे घर अनेक दशकांपासून प्रत्येक गावात बांधले गेले आहे. येथे पितरांचा   आत्मा हंड्यात वास करतात. बस्तरच्या नारायणपूर आणि अबुझमाड भागात अशी अनेक आत्म्याची घरं पाहायला मिळतील.
 
असे मानले जाते की येथे पणजोबा, आजोबा आई-वडिलांच्या आत्म्यास जिवंत राहतात. इथे 12 महिने लोक उपासना करतात. उत्सवात विशेष पूजा असते. आदिवासी समाजात कुडा, आना कुडमा याविषयी खोलवर श्रद्धा आहे. कुडमात कोणी चुकून किंवा जाणूनबुजून नवीन पीक वापरण्यास घेतल्यास गावावर संकट येते, असे ग्रामस्थांचा विश्वास आहे. गावकरीहे संकट निवळण्यासाठी गायता येथे जातात, तिथे चूक मान्य करून देवाला नवीन पीक देऊन पूजा केली जाते. 
 
पितृ देव दुष्ट आत्म्यांपासून संरक्षण करतात. कोणत्याही गावाच्या टोकाला चहूबाजूंनी एक छोटेसे मंदिरासारखे घर दिसते. त्यात एक छोटी खोली असते  ज्यात अनेक भांडी ठेवली आहेत. आदिवासी समाजातील पूर्वज या हंड्यात राहतात. अशा आदिवासी समाजात घरातील एक खोली ही पूर्वजांची असते. अबुझमाड या आदिवासी गावात एकाच गोत्राचे लोक बहुसंख्य आहेत. एखाद्याच्या मृत्यूनंतर, त्यांच्या आत्म्याला गोत्रातील लोक या आना कुरमा मध्ये स्थापित करतात.
 
पितृदेव हेच त्यांचे आराध्य रक्षक दैवत असल्याची आदिवासी समाजाची श्रद्धा आहे. जेव्हा ते एकाच ठिकाणी एकत्र असतात तेव्हा त्यांची शक्ती अमर्यादित होते आणि ते दुष्ट आत्म्यांचा नाश करण्यास मदत करतात. यामुळेच आदिवासी समाजही त्यांच्या पूर्वजांना आना कुडमा नावाच्या वेगळ्या मंदिरात स्थापन करतात.

आदिवासी पितर सण साजरे करत नाहीत, तर पूर्वजांची पूजा त्यांच्या रीती-भाती ने करतात. सणवार किंवा आदिवासींच्या विशेष प्रसंगी येथे विशेष पूजा केली जाते.  देवाचा वास आत्म्यातच असतो असे इथल्या लोकांचा विश्वास आहे.