ख्रिसमस बजेटमध्ये साजरा करायचा आहे, या ठिकाणांना नक्की भेट द्या
IndiaTourism : जगभरात 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. तसेच अनेक जणांना ख्रिसमस एखाद्या रमणीय स्थळी जाऊन साजरा करायचा असतो पण काही वेळा बजेटमुळे योजना पूर्ण होत नाही. तुम्ही ख्रिसमस निमित्त काही उत्तम ठिकाणांना भेट देण्याची योजना करू शकता. भारतात असे काही ठिकाण आहे जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात. याशिवाय तुमच्या बजेटवर फारसा परिणाम होणार नाही.
नैनिताल-
दिल्ली ते काठगोदाम या रेल्वेने तुम्ही 300 ते 400 रुपयांमध्ये नैनितालला जाऊ शकता. तसेच इथल्या हॉटेलमध्ये राहण्याचा खर्चही फारसा नाही. येथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. याशिवाय नैनी देवीला भेट देखील देऊ शकतात. तसेच येथील स्नो व्ह्यू पॉइंट ऑन पीस पाहण्याचा आनंदही घेऊ शकता. उत्तराखंडमधलं हे खूप सुंदर ठिकाण असून बजेटमध्ये ख्रिसमस साजरा करण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे.
जैसलमेर-
हिवाळ्यात राजस्थानच्या जैसलमेर शहराला भेट देण्याची मजा काही वेगळीच आहे. सॅम सँड ड्युन्स, कुलधारा गाव, जैसलमेर किल्ला, अमर सागर, गडीसर तलाव, पटवों की हवेली इत्यादी ठिकाणे ख्रिसमस निमित्त भेट देण्यासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय येथे उंट सवारी आणि जीप सफारीचा आनंद लुटता येतो. येथे भेट देण्यासाठी तुम्हाला बजेटची काळजी करण्याची गरज नाही.
मसुरी-
उत्तराखंडमधील मसुरी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. तसेच विशेष करून डिसेंबर मध्ये याचे सौंदर्य वाढते. येथे उपस्थित असलेले पर्वत आणि सुंदर दऱ्या मनाला भुरळ घालतात. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करू शकता. येथे तुम्ही मॉल रोड, लाल टिब्बा, कंपनी गार्डनला भेट देऊ शकता. येथे राहण्यासाठी हॉटेल्स आणि होम स्टे देखील उपलब्ध आहे. याशिवाय धर्मशाळेतही राहण्याची उत्तम व्यवस्था होऊ शकते. मसुरीमध्ये तुम्ही धनौल्टी, सुरकंदा मंदिराला भेट देऊ शकता. ख्रिसमस निमित्ताने या ठिकाणी भेट देणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.
चक्रता-
उत्तराखंडचे सुंदर हिल स्टेशन चक्रता हे देखील ख्रिसमस निमित्ताने भेट देण्याचे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे बसेस डेहराडून ते चक्रता येथे जात येते. तसेच कनासर, टायगर फॉल्स, देव बन पक्षी निरीक्षण, बुधेर गुहा, यमुना ॲडव्हेंचर पार्क, राम ताल हॉर्टिकल्चर गार्डनला भेट देण्याचा आनंद घेता येतो. ख्रिसमस निमित्ताने या ठिकाणी भेट देणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.