गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 23 मे 2016 (12:28 IST)

आमिर खान संगीतकाराच्या भूमिकेत दिसणार

खान तिकटीपैकी सलमान, शाहरूख यांचे काही महत्त्वाचे सिनेमे रिलीज होत असताना 2017 सालातही त्यांचे काही सिनेमे प्रदर्शित होत असल्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या यादीत आमिरचा दंगल नंतर कोणताच सिनेमा नाही. त्यामुळे 2017 सालात आमिर पडद्यावर दिसणार नाही यामुळे नाराज झालेल्या त्याच्या फॅनसाठी खुशखबर आहे.
 
आमिरने त्याचा माजी मॅनेजर अद्वैत चंदन याने लिहिलेल्या पटकथेसाठी काम करण्याचा निर्णय घेतला असून या कथेवरून बनविल्या जाणार्‍या चित्रपटात आमिर संगीतकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. गायिका बनण्याची जबरदस्त इच्छा असलेल्या एका सुंदर मुलीची ही कहाणी असल्याचे समजते. या चित्रपटाबाबत आताच जादा काही सांगण्यास अद्वैत चंदन यांनी नकार दिला आहे मात्र आमिर या चित्रपटात काम करणार असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.