रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 सप्टेंबर 2016 (15:28 IST)

उत्सुकता प्रियंकाच्या ‘क्वांटिको 2’ची..

प्रियंका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये चांगलीच रूळलचे दिसत आहे. तिचा लोकप्रिय अमेरिकन टीव्ही शो क्वांटिको याच्या दुसर्‍या सीझनची जोरदार चर्चा सुरू असताना सध्या दुसर्‍या भागाची झलक दाखवण्यात येत आहे. यावरून हा दुसरा भाग नक्कीच काहीतरी मनोरंजक असल्याचे जाणवत आहे. या शोमध्ये प्रिांकाबरोबर काम करत असलेला पिग्गी चॉप्स या अभिनेत्याने आपल्या चाहत्यांसाठी या शोची एक झलक ट्विटरवरून दिली आहे. प्रियंकानेही हा व्हीडीओ आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला असल्याचे समजले आहे. या व्हीडीओत क्वांटिकोच्या दुसर्‍या भागातील एक सीन शूट केला आहे. अतिशय अप्रतिम असा हा सीन शूट केला गेला आहे. या सीनमध्ये ती सर्वांच्या  नजरा चोरून पोहोचलेली दाखवण्‍यात आली आहे. तिथे आल्यावर ती तेथील सामानाची तपासणी करत असते. तेवढय़ा वेळात तिथे एक रक्षक येतो आणि तो तिच्यावर बंदूक रोखतो. मग प्रियंकाही त्या रक्षकाबरोबर झटापट करताना दाखवली आहे. हा सीन इतक्या वेगळ्या  पद्धतीने शूट करण्यात आला आहे की, तो अगदीच जिवंत वाटतो. या सीनमधील अँक्शनच भूमिकेतील प्रियंका काहीशी वेगळीच वाटली आहे. तिने तो सीन दमदार पद्धतीने पूर्ण केला आहे. येत्या 25 तारखेपासून क्वांटिकोचा हा दुसरा भाग सुरू होणार आहे. या दुसर्‍या भागात प्रियंका सीआयए एजंटची व्यक्तिरेखा साकारत आहे. पहिल्या भागातील प्रियंकाची व्यक्तिरेखा एफबीआयचे प्रशिक्षण घेणार्‍या शिकाऊ व्यक्तीची होती. जी एका कटकारस्थानाची शिकार होते. नुकतेच प्रियंकाने अँमी पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालनही केले आहे.