सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 22 जून 2016 (12:47 IST)

काय म्हणाला 'शिवाय'ची हिरॉइन सायशाबद्दल अजय देवगन

सायशा बॉलिवूडमध्ये अजय देवगन निर्देशित 'शिवाय'मधून आपल्या करियरची सुरुवात करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. शिवायबद्दल चर्चा सुरू झाली आहे आणि सिनेप्रेमी चित्रपट बघण्यासाठी उत्सुक दिसत आहे. सायशाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि तिच्यात ते सर्व गुण आहे जे एका बॉलिवूडच्या मोठ्या स्टारमध्ये असायला पाहिजे. अजय देवगन एक नवीन चेहर्‍याला लाँच करणार असल्यामुळे सायशा फारच खूश आहे.  
 
सायशाच्या कामाबद्दल अजय म्हणतो, "मी जेव्हा सायशाचे स्क्रीन टेस्ट घेतले तेव्हा मला तिच्यात बर्‍याच शक्यता दिसल्या. असे फारच कमी होते की एवढ्या सुंदर व्यक्तीमध्ये एवढी क्षमता असते. मला फार उत्तम करणार्‍याची गरज होती." 
 
सायशा चित्रपटात अनुष्काच्या भूमिकेत आहे. चि‍त्रपट 28 ऑक्टोबरला दिवाळीच्या दिवशी रिलीज होणार आहे.