रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 15 सप्टेंबर 2016 (15:54 IST)

क्रिश रुपातली गणेश आणि हृतिकचा 'क्रिश 4'

या गणेश उत्सवात अनेक रूपातील गणेश मूर्ती आपण पाहिल्या तर अनेक सिरीयल आणि इतिहासातील गाजलेल्या चेहरे सुधा गणेश रुपात होत्या. बॉलीवूड सुपर स्टार असलेल्या  हृतिक रोशनने ‘क्रिश’ चित्रपटात सुपर हिरोची भूमिका केली होती.तर  या व्यक्तिरेखेच्या रुपातली गणेशमूर्तीही अनेकांचं लक्ष वेधून घेत होती. हीच मूर्ती पाहून रोशन कुटुंबीयांनी क्रिश चित्रपटाच्या पुढच्या आवृत्तीची घोषणा केली आहे. 
 
दिग्दर्शक राकेश रोशन यांनी क्रिश 4 हा चित्रपट करण्याची घोषणा केली आहे. अभिनेता हृतिक रोशनने ट्विटरच्या माध्यमातून ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहचवली आहे.त्यानंतर क्रिश4 हा हॅशटॅग ट्रेण्डही झाला.  
चित्रीकरणाला पुढच्या वर्षी सुरुवात होईल, तर 2018 च्या नाताळमध्ये सिनेमा प्रदर्शित होईल.
 कोई मिल गया (2003), क्रिश (2006) आणि क्रिश 3 (2013) या मालिकेतला क्रिश 4 हा चौथा भाग असेल.