सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

बिपाशाला 10 कोटींचं आलिशान अपार्टमेंट गिफ्ट?

सध्या चर्चा आहे सलमान खान आणि बिपाशा बासू यांच्याबाबत. सलमानने बिपाशाला वेडिंग गिफ्ट म्हणून 10 कोटींचं आलिशान अपार्टमेंट दिल्याची चर्चा आहे. बिपाशाच्या रिसेप्शनवेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्यापासून अभिनेता सलमान खानही सहभागी झाला होता. 
 
सलमान आणि बिपाशा यांच्यात चांगली मैत्री आहे. त्यामुळे अर्थात मीडियाची नजरही या दोघांवर होती. आता या दोघांबाबत एक चर्चा सुरु झालीय की, सलमानने बिपाशाला वेडिंग गिफ्ट म्हणून 10 कोटींचं आलिशान अपार्टमेंट दिलं. बिपाशाने या चर्चावर नाराजी व्यक्त करत ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिले आहे. मी कुणाकडून अशाप्रकारे गिफ्ट का घेईन, असा सवाल करत या चर्चा बिपाशाने फेटाळल्या आहेत.