गुरूवार, 16 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 4 जून 2016 (16:29 IST)

राधिका आपटे झाली भलतीच खूश

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे सध्या भलतीच खूश झाली आहे. राधिकाच्या नुकत्याच रिलीज झालेल्या फोबिया चित्रपटाचं कौतुक होत आहे. फोबियातल्या राधिकाच्या अभिनयावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे, त्यामुळे राधिका सातवे आसमानपे आहे. पवन कृपलानी यांनी दिग्दर्शित केलेल्या फोबिया या चित्रपटाची बॉलिवूडमधल्या दिग्गजांनीही स्तुती केली. फोबियाबद्दल बर्‍याच चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत, हा चित्रपट घाबरवणारा आहे असं ऐकलं आहे, असं ट्विट करण जोहरनं केलं आहे.