सनी लियोन दिवसेंदिवस लोकप्रियतेचे खीखर गाठत असल्याने आपल्या उत्पादनांच्या प्रचारासाठी तिला साइन करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. सनीचे झटके लटके असलेले 'लैला तेरी लूट लेगी' गाणे हिट झाले असून ती चांगलीच चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर एनर्जी ड्रिंक एक्स एक्स एक्स ने तिला ब्रँड ऍम्बेसेडर नियुक्त केले आहे.
सनी तरुणाईमध्ये खूपच लोकप्रिय असून एनर्जी ड्रिंकही यंगिस्तानला लक्ष करूनच बनवण्यात आल्याने सनीहून सरस मॉडेल मिळणे शक्य नव्हते, असे कंपनीने स्पष्ट केले.
नुकताच मुंबई मिरर चित्रपटातून झळकलेला सचिन जोशी या उत्पादनाशी जुळलेला असल्याने तोही सनीसोबत दिसत आहे. सनीच्या एनर्जी मुळे या ड्रिंक्सला निश्चितच 'एनर्जी' मिळेल, अशी आशा करूया.