शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

लोकसभाध्यक्षाकडून ‘दंगल’चे खास स्क्रीनिंग

लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी बालयोगी ऑडिटोरियममध्ये खासदार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘दंगल’ चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं. लोकसभाध्यक्षांसह अनेक खासदारांनी ‘दंगल’वर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शो पाहण्यासाठी लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन, ग्रामीण विकास राज्य मंत्री रामकृपाल यादव, भाजप खासदार जगदंबिका पाल, टीआरएस खासदार मल्ला रेड्डी यांच्यासह अनेक खासदारांनी उपस्थिती लावली होती.

चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांनीच ‘दंगल’चं मनापासून कौतुक केलं. खासदार जगदंबिका पाल यांनी तर सहकुटुंब या चित्रपटाचा आनंद लुटला. चित्रपट पाहून तेलंगणाच्या खासदारांच्या डोळ्यात तर अश्रू तरळले. चित्रपटगृहांतून आतापर्यंत हा सिनेमा उतरला असला, तरी खासदारांच्या मनात त्याने घर केलं आहे.