रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 सप्टेंबर 2018 (16:47 IST)

अभिनेता दलीप ताहिल यांची दारुच्या नशेत रिक्षाला धडक

अभिनेता दलीप ताहिल यांनी दारुच्या नशेत त्यांनी एक रिक्षाला धडक दिली. यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सोमवारी रात्री ९ वाजता ही घटना घडली. खारमध्ये राहणारे जेनिता गांधी (२१) आणि गौरव चुघ (२२) रिक्षातून जात असताना दलीप यांच्या कारने त्यांना धडक दिली. अपघातात जेनिताच्या पाठीला आणि मानेला गंभीर दुखापत झाली आहे.
 
गौरव याने रिक्षातून बाहेर येऊन पाहिलं असता कार सांताक्रूझच्या दिशेने जात असल्याचं त्याने पाहिलं. दलीप ताहिल यांनी घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण रस्त्यावर गर्दी असल्याने ते जास्त दूर जाऊ शकले नाहीत. खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय यांनी सांगितलं आहे की, ‘दलीप यांना अटक करण्यात आली होती, नंतर त्यांना जामीनावर सोडण्यात आलं. दलीप यांनी रक्ताची चाचणी करण्यास नकार दिला. मात्र त्यांच्याकडून पाहून मद्यपान केलं असल्याचं लक्षात येत होतं’.