गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 24 सप्टेंबर 2018 (10:58 IST)

रुदालीच्या निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे निधन

चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या आणि पटकथालेखिका कल्पना लाज्मी ( ६४) यांचे मुंबईतील कोकिलाबेन धिरुबाई अंबाई रुग्णालयात निधन झाले. त्या गेल्या काही दिवसांपासून किडनी कॅन्सरने त्रस्त होत्या. त्यामुळे त्यांना डायलिसीसवर ठेवण्यात आले होते. याबाबतची माहिती त्यांचा भाऊ देव लाज्मी यांनी दिली आहे. त्यांनी रुदाली, दमन, दरमियान चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांचे चित्रपच हे महिलाप्रधान होते. २००६ मध्ये दिग्दर्शीत केलेला 'चिंगारी' हा त्यांचा अखेरचा चित्रपट होय.