1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 24 सप्टेंबर 2018 (15:04 IST)

आमिरवर आली अशी स्थिती बसला गाढवावर

thugs of hindostan
अभिनेता आमीर वर गाढवावर बसण्याची वेळ आली असून त्यानेच ती शेअर केली आहे. झाले असे की अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्यामागोमाग आता 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मधील आणखी लुक्क्स बाहेर पडत आहेत. त्यात सर्वात चर्चित चेहरा कलाकार म्हणजे अभिनेता आमिर खान. या चित्रपटातील आमिरचा लूक पाहता तो कमालीचा लक्षवेधी वाटत आहे. यामध्ये तो 'फिरंगी मल्लाह' असं तो किरदार साकारत असून, आमिरनेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा लूक शेअर केला आहे.
 
आमिर म्हणतो की 'और इ हैँ हम, फिरंगी मल्लाह. हम से ज्यादा नेक इन्सान इस धरती पे कहीं नहीं मिलेगा आपको. सच्चाई तो हमरा दूसरा नाम है, और भरोसा हमरा काम. दादी कसम !!!', असं कॅप्शन देत त्याने मोशन पोस्टर शेअर केला. या पोस्टर मध्ये तो कुरळे केस, डोळ्यांवर रंगीत चष्मा, सोबत असणारी मद्याची बाटली अशा एकंदर रुपात आमिर सर्वांनाच सलाम ठोकत आहे. 'ठग्स....'च्या या टोळीत आता आमिरची भूमिका नेमकी असणार तरी काय, हेच जाणून घेण्यासाठी आतचा प्रेक्षकांची उत्सुकता आहे. वेगळ्याच दुनियेची सफर घडवणारा हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २७ तारखेला त्याचा ट्रेलर येणार आहे.