शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जानेवारी 2023 (15:06 IST)

अभिनेत्री राखी सावंत मुंबई पोलिसांच्या ताब्यात; काय आहे नेमके प्रकरण?

मुंबई पोलिसांनी अभिनेत्री राखी सावंतला ताब्यात घेतले आहे. काही वेळाने पोलीस राखी सावंतला अंधेरी न्यायालयामध्ये हजर करणार आहेत.
 
अधिक माहितीनुसार, आंबोली पोलिसांनी राखी सावंतला ताब्यात घेतले आहे. राखी सावंतवर एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. यानंतर मॉडेलच्या तक्रारीवरुन राखी सावंतवर आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिच्या तक्रारीवरुन नोव्हेंबर २०२२ मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत राखीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करुन देखील ती हजर राहत नव्हती.
 
त्यामुळे  पोलीस पथकाने तिला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयाने कालच राखी सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता, त्यानंतर आज तिला ताब्यात घेण्यात आले आहे. आता राखीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिनेत्री शर्लिन चोप्राने एक ट्वीट शेअर केले आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor