गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जुलै 2020 (21:38 IST)

आयुष्मान खुरानाने कुटुंबाला एक आलिशान घर भेट दिले

अभिनेता आयुष्मान खुरानाने आपल्या कुटुंबाला  एक आलिशान घर भेट स्वरुपात दिलं आहे. पंचकुला भागात त्यानं हे नवं घर खरेदी केल आहे. या घराची किंमत तब्बल 9 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.  
 
आयुष्मानच्या या कुटुंबात आई- वडिल पूनम आणि पी. खुराना, खुद्द आयुष्मान आणि त्याची पत्नी ताहिरा कश्य, भाऊ अपारशक्ती खुराना आणि त्याची पत्नी आकृती यांचा समावेश आहे. खुराना कुटुंबीयांनी चंदीगढमधील सॅटेलाईट टाऊन येथे या नव्या घराची खरेदी केली. 
 
आपल्या या नव्या घराविषयी सांगताना आयुष्यमान म्हणाला, 'खुराना कुटुंबाला आता त्यांच्या कुटुंबाचं हक्काचं घर सापडलं आहे. संपूर्ण कुटुंबानंच हे घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या घरात संपूर्ण खुराना कुटुंब राहू शकतं.