शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2023 (10:14 IST)

Ayushmann Khurrana :वडिलांना निरोप देताना आयुष्यमान खुराना आणि अपारशक्ती खुराना भावुक

Ayushmann Khurrana : बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान आणि अपारशक्ती खुराना यांचा वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर चंदीगड येथे रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. वडिलांना निरोप देताना आयुष्यमान आणि अपारशक्ती हे दोघे भावुक होते. त्यांचे वडील पी खुराना हे ज्योतिषतज्ञ होते. ते खूप प्रसिद्ध होते.काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने खुराना कुटुंबियांवर शोककळा पसरली असून आयुष्यमान आणि अपारशक्ती यांना मोठा धक्का बसला आहे.   
 
 आयुष्मान आणि अपारशक्ती खुराना यांच्या वडिलांना दोन दिवसांपूर्वी पंजाबमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर हृदयविकाराच्या आजारावर उपचार सुरू होते.ही दुःखद बातमी समोर येताच इंटरनेट विश्वात खळबळ उडाली आहे. यासोबतच इंडस्ट्रीतील स्टार्स अभिनेत्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहताना त्यांचे सांत्वन करताना दिसत होते. 
 
अभिनेता अपारशक्ती खुराना यांच्या प्रवक्त्याकडून अधिकृत निवेदन असे वाचण्यात आले की, 'आम्हाला कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की आयुष्मान आणि अपारशक्ती खुराना यांचे वडील ज्योतिषी पी खुराना यांचे आज सकाळी 10:30 वाजता मोहाली येथे दीर्घ आजाराने निधन झाले. आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. या वैयक्तिक नुकसानीच्या वेळी तुमच्या प्रार्थना आणि पाठिंब्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत. अभिनेता आयुष्मान खुरानाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याचे वडील त्याचे 'लाइफ कोच आणि मेंटॉर' होते.
आयुष्यमानला येत्या 20 मे रोजी चंदीगड येथे उपराष्ट्रपती यांच्या हस्ते कलारत्न पुरस्कार मिळणार आहे.दुर्देवाने हा आनंद त्याला आपल्या वडिलांसोबत शेअर करता येणार नाही. पी. खुराना  यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजे 19 मे रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचा वाढदिवस 18 मे रोजी असतो. 
 
 

Edited by - Priya Dixit