सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 11 मार्च 2019 (09:10 IST)

'बदला' ची बॉक्स ऑफिसरवर चांगली कामगिरी

जेष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू स्टारर 'बदला' सिनेमा बॉक्स ऑफिसरवर चांगलीच कामगिरी करताना दिसत आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. त्यांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केला. सिनेमाने पहिल्याच दिवशी 5.04 कोटी रूपयांची मजल मारली आहे. 
 
'माफ कर देना हर बार सही नहीं होता' अशी टॅग लाइन असलेला 'बदला' सिनेमा गौरी खान, सुनीर खेत्रपाल आणि अक्षय पुरी यांनी 'रेड चिली एन्टरटेन्मेट' बॅनरखाली निर्मित केला आहे. 'बदला' सिनेमा 2016 रोजी प्रदर्शित झालेल्या 'कॉन्ट्राटिएम्पो' या स्पॅनिश सिनेमाची रिमेक आहे.