कलर्स वाहिनीकडून जाहीर माफीनामा सादर
‘मराठीची चीड येते’ म्हणत मराठी भाषेचा अपमान करणे गायक जान कुमार सानूला चांगलेच महागात पडले आहे. आता कलर्स वाहिनीने आपला जाहीर माफीनामा सादर केला आहे. कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत माफी मागितली आहे. मराठीचा अवमान करणारे वक्तव्य वाहिनीच्या एका कार्यक्रमात व्यक्त झाले होते.
या प्रकरणी माफी मागताना, कलर्स टीव्हीने यां पत्रात म्हटले की, ‘कलर्स वाहिनीवर 27 ऑक्टोबरला प्रसारित करण्यात आलेल्या एपिसोडमध्ये मराठी भाषेसंदर्भात आम्हाला अनेक तक्रारी मिळाल्या.
आम्ही या आक्षेपांची नोंद केली आहे आणि आम्ही ते ज्या ठिकाणी बोललं गेलं आहे तो भाग प्रसारित होणाऱ्या सर्व एपिसोड्समधून काढतो आहोत. मराठी भाषेसंदर्भातील वक्तव्याने महाराष्ट्रातील जनतेची मनं दुखवली गेली, याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमच्यासाठी आमचे प्रेक्षक अमूल्य आहेत. शिवाय सगळ्या भाषा सन्मानीय आहेत.’