1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (19:42 IST)

बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हरने त्यांच्या मुलीचे नाव जाहीर केले

Bipasha and Karan Singh Grover got baby girl  Bipasha and Karan Singh Grover announced their daughter's name devi singh grover bollywood gossips news in marathi
बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या आनंदाचे वातावरण आहे. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर आज एका गोंडस मुलीचे पालक झाले आहेत. अभिनेत्री बिपाशा बसूने शनिवारी मुलीला जन्म दिला आहे. ही माहिती त्यांच्या टीमने दिली असून आता खुद्द जोडप्याने या गोड बातमीला दुजोरा दिला आहे. तिने एक हृदयस्पर्शी नोट देखील शेअर केली आणि त्यांनी त्यांच्या छोट्या चिमुकलीचे नाव काय ठेवले आहे ते देखील सांगितले...
 
बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी लग्नाच्या सहा वर्षानंतर आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. या आनंदाच्या बातमीने चाहतेही खूप खूश आहेत आणि सोशल मीडियावर दोघांचे पालक बनल्याबद्दल अभिनंदन करत आहेत. चाहते बिपाशा आणि करणच्या चिमुकलीला बघण्यासाठी उत्सुक आहे. 
 
बिपाशाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये हे जोडपे त्यांच्या चिमुकलीचे पाय आपल्या तळहातावर धरलेले दिसत आहे. हा फोटो शेअर करताना जोडप्याने लिहिले- "आज आमची मुलगी आमच्या प्रेमाने आणि आईच्या आशीर्वादाने आमच्यासोबत आहे आणि ती देवी आहे.". यासोबत त्यांनी मुलीचे नाव लिहिले - "देवी बसू सिंग ग्रोवर".
बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरची भेट 'अलोन' चित्रपटादरम्यान झाली होती आणि 2015 मध्ये एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर, 2016 मध्ये या जोडप्याने लग्न केले. बिपाशाने काही दिवसांपूर्वी तिच्या प्रेग्नेंसीची माहिती दिली होती आणि तेव्हापासून ती सोशल मीडियावर सतत अपडेट्स शेअर करत असते.
 
Edited  By - Priya Dixit