गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 22 मे 2017 (12:08 IST)

Cannes-film-festival : कान्सचा महत्त्वपूर्ण नियम ऐश्वर्याने तोडला

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या चौथ्या दिवशी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने रेड कार्पेटचा एक महत्त्वपूर्ण नियम तोडला आहे.  ऐश्वर्या राय राल्फ अ‍ॅण्ड रसो यांनी डिझाइन केलेला लाल रंगाचा गाउन परिधान करून रेड कार्पेटवर उतरली. मात्र रेड कार्पेटवर सेलिब्रिटींनी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये एंट्री करू नये असा महत्त्वपूर्ण नियम आहे. 

ऐश्वर्या गेल्या 16 वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत असल्यामुळे कान्सचे प्रत्येक नियम चांगल्या पद्धतीने जाणून आहे. अशात तिने कान्सचे नियम तोडत केलेली एंट्री वादग्रस्त ठरली आहे. वास्तविक ऐश्वर्याची ही एंट्री अनेकांना अचंबित करणारी होती. शिवाय तिचा ग्लॅमर अंदाजही अनेकांना आवडला. परंतु तिने नियमांचे उल्लंघन केल्याचीही यावेळी जोरदार चर्चा रंगली होती.