रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 14 नोव्हेंबर 2018 (15:39 IST)

असा झाला साखरपुडा आणि मेहंदी व संगीताचा कार्यक्रम

बॉलीवूडचे लव्ह बर्ड दीपिका आणि रणवीर सिंह आज इटली मधील लेक कॉमोमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली आहे. मंगळवारी त्यांचा साखरपुडा आणि मेहंदी व संगीताचा कार्यक्रम झाला. यावेळी वधूवराने एकमेकांच्या बोटात अंगठी घालून सोबत राहण्याच्या आणाभाकाही घेतल्या. त्यानंतर रणवीरने फिल्मी स्टाईलने दीपिकावरील प्रेम जाहीर केले. ते ऐकताच भावना अनावर झाल्याने दीपिकाला रडू कोसळले. दीपिकाला रडताना बघून सगळ्याच जणांचे डोळे पाणावले. त्यावेळी रणवीरने तिला आपल्या मिठीत घेत शांत केले. बुधवारी संध्याकाळी 6.30 ते 9.30 या वेळेत हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
 
संगीत आणि मेहंदीच्या कार्यक्रमातही दीपवीरने धमाल उडवली. तुने मारी एन्ट्री आणि ओ हसीना जुल्फोवाली या गाण्यावर दीपिका आणि रणवीरने स्पेशल डान्स केला. या कार्यक्रमादरम्यान दीपिकाच्या डोळ्यात अनेकवेळा अश्रू तरळल्याचे दिसत होते.