रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 10 जुलै 2018 (10:50 IST)

एकताला पार्टनर मिळाला

सरतेशेवटी 42 वर्षांची डायरेक्टर, प्रोड्युसर आणि टीव्ही क्वीन एकता कपूरला पार्टनर मिळाला. तिच्या स्वतःच्याच इन्स्टाग्रावरच्या पोस्टवरून ही बाब अगदीच स्पष्ट झाली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राच्या अकाउंटवर एका कपलचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे आणि त्याच्या कॅप्शनमध्ये दोन हृद्य ओळी लिहिल्या आहेत. 'काही गोष्टी उशिरा जरी मिळाल्या, तरी पण त्याची वाट पाहणे भविष्यासाठी निश्चितच फायद्याचे असू शकते.' असे तिने म्हटले आहे. आपले घरवाले आपल्याला लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे एकताने एका इंटरव्ह्यूध्ये म्हटले होते. 
 
मात्र आपण लग्नासाठी इतक्यात तयार नसल्याचे कारण तिने घरच्यांना सांगून टाकले होते. कारण तिच्या ज्या दोस्तांची लग्ने झाली आहेत, ते आता पुन्हा सिंगल झाले आहेत. गेल्या काही वर्षात लग्नानंतर घटस्फोट घेणार्‍यांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे आपण योग्य गोष्टीसाठी वाट बघत असल्याचा आपल्याला फायदाच झाला असेही तिने म्हटले होते. आपल्याला मूलही हवे आहे, मात्र त्यासाठी लग्न करण्याचा आपला काही विचार नसल्याचेही ती म्हणाली होती. सातत्याने महिलांशी संबंधित मालिका बनवणार्‍या एकताचे विचार स्त्रीमक्तीवादी असणे अगदी स्वाभाविक आहे. अगदी चार दिवसांपूर्वीच्या एका इंटरव्ह्यूमध्ये तिने लग्न न करण्याचे कारणही सांगितले होते. लग्र करण्यापेक्षा ते टिकवण्यासाठी लागणारे धैर्य आपल्याकडे नाही, म्हणूनच इतकी वर्षे लग्न टाळल्याचे ती म्हणाली आहे. पण तरीही काही गोष्टी अशा असतात ज्यासाठी लागणारा संयम आपल्याकडे नसल्याचेही तिने स्पष्ट केले. तिचे पप्पा जितेंद्र यांनीही एकताच्या लग्नाबाबत चिंता व्यक्त केली होती.