सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जून 2023 (08:22 IST)

‘गदर 2’चं पहिलं गाणं प्रदर्शित; प्रेक्षकांना आवडली तारा-सकीनाची केमिस्ट्री

बॉलिवूड अभिनेते सनी देओल आणि अभिनेत्री अमीषा पटेल यांच्या मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या ‘गदर 2’ चित्रपटातील पहिलं गाणं ‘उड़ जा काले कावा’ प्रदर्शित झालेलं आहे. हे गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

2001 मध्ये प्रदर्शित झालेला 'गदर' हा चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात. या चित्रपटात अमिषानं सकिना ही भूमिका साकारली. तसेच सनी देओलनं गदर चित्रपटात तारा सिंह ही भूमिका साकारली. या चित्रपटामधील गाण्यांना आणि चित्रपटामधील डायलॉग्सला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गदर-2 मधील  ‘उड जा काले कावा’ हे गाणं नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.  
 
‘मैं निकला गड्डी लेकर’ और ‘उड जा काले कावा’ ही गदर या चित्रपटामधील गाणी हिट ठरली. आजही ही गाणी प्रेक्षक ऐकतात. नुकतेच ‘उड जा काले कावा’ या चित्रपटाचे नवे व्हर्जन रिलीज करण्यात आलं आहे. हे नवे व्हर्जन गदर-2 चित्रपटात असणार आहे. ‘उड जा काले कावा’ या गाण्याच्या नव्या व्हर्जनमध्ये सकिना आणि तारा सिंह यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना पुन्हा बघायला मिळणार आहे.

Edited By - Ratnadeep ranshoor